Shubman Gill : पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? शुबमन गिलबाबत ‘ही’ माहिती आली समोर

133
Shubman Gill : शुबमन गिल पुढच्या सामन्यालाही मुकणार

सध्या फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिल (Shubman Gill) डेंग्यूची लागण झाल्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दरम्यान गिल पुढील सामन्यालाही मुकणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे भारताच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघासह दिल्लीला जाणार नाही आणि तो चेन्नईमध्ये राहील, असे बीसीसीआयने एका निवेदनात सांगितले आहे.

त्यामुळे शुभमन गिल (Shubman Gill) आता संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) खेळू शकेल की नाही हे ठामपणे सांगता येत नाही आहे. मात्र ११ तारखेला होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मात्र शुभमन गिल हा मैदानावर दिसणार नाही. गिलच्या गैरहजेरीत ईशान किशन हा सलामीला येण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – ICC World Cup 2023 : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ खरंच वेगळी जर्सी परिधान करणार का? )

काही दिवसांपासून शुभमन गिलला (Shubman Gill) ताप येत होता. त्याची शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी डेंग्यूची चाचणी करण्यात आली. त्याच्या प्रकृतीमध्ये अद्याप हवी तशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता त्याच्या जागी ईशान किशन खेळणार आहे.

शुभमन गिल (Shubman Gill) याच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिल ९ ऑक्टोबर, २०२३ रोजी संघासोबत दिल्लीला जाणार नाही. आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे संघाचा पहिला सामना खेळू न शकलेला सलामीवीर ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणारा अफगाणिस्तानविरुद्ध पुढील सामना खेळू शकणार नाही. तो चेन्नईतच वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहणार आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.