Special Mission 3.0 : विशेष मोहीम ३.० च्या प्रगतीचा आढावा घेत केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केल्या ‘या’ भावना

सार्वजनिक इंटरफेससह कार्यालयांमध्ये प्रलंबितता कमी करणे आणि स्वच्छता यावर या मोहिमेचा भर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

191
Special Mission 3.0 : विशेष मोहीम ३.० च्या प्रगतीचा आढावा घेत केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केल्या 'या' भावना
Special Mission 3.0 : विशेष मोहीम ३.० च्या प्रगतीचा आढावा घेत केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केल्या 'या' भावना

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिम ३.० च्या पहिल्या आठवड्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि ऑक्टोबर २-७, २०२३ या कालावधीत प्रलंबितता कमी करण्यासाठी आणि स्वच्छतेला संस्थात्मक स्वरूप देण्याच्या दृष्टीने झालेल्या प्रगतीची प्रशंसा केली. (Special Mission 3.0)

मंत्रालये/विभाग आणि त्यांच्या क्षेत्रीय/बाह्य कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. सार्वजनिक इंटरफेससह कार्यालयांमध्ये प्रलंबितता कमी करणे आणि स्वच्छता यावर या मोहिमेचा भर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. देशाच्या सर्व भागांतील सर्व दुर्गम भागातील कार्यालये/संरक्षण आस्थापने आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये ही मोहीम राबवण्यासाठी त्यांनी मंत्रालये/विभागांना मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये ही मोहीम पूर्णत्वाला नेण्याचा दृष्टीकोन अवलंबण्याचे आवाहन केले. (Special Mission 3.0)

विशेष मोहीम ३.० ही पहिल्या आठवड्यात, व्याप्ती आणि प्रमाणाच्या दृष्टीने सर्वसमावेशक आहे आणि देशभरातील कार्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवण्यात आला आहे. ४२००० हून अधिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली आहे. सर्व मंत्रालये/विभागांकडून ४००० ट्विट जारी करण्यात आले असून त्यात क्षेत्रीय कार्यालये/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/संरक्षण आस्थापना/दूतावास आणि टपाल कार्यालयात राबवलेल्या मोहिमेच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये हजारो अधिकारी आणि नागरिकांच्या प्रयत्नातून स्वच्छतेसाठी जनचळवळ निर्माण झाली आहे. (Special Mission 3.0)

विशेष मोहीम ३.० चे भारत सरकारचे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि सचिवांनी आढावा घेतला असून हे अंमलबजावणीमध्ये नेतृत्व आणि मार्गदर्शन प्रदान करते. अंमलबजावणी टप्प्याच्या पहिल्या आठवड्यात, टपाल विभागाने १२७८५ ठिकाणी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ११५८८ ठिकाणी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ८६५२ ठिकाणी, लष्करी कार्य विभागाने ३००० ठिकाणी आणि खते विभागाने १५८५ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आहे. (Special Mission 3.0)

(हेही वाचा – Israel Palestine Conflict: हमाससमोर इस्त्रायलचे ‘Iron Dome’ का ठरते निष्प्रभ ? वाचा सविस्तर…)

विशेष मोहीम ३.० च्या प्रगतीचे निरीक्षण एका समर्पित पोर्टलवर (https://scdpm.nic.in/) दैनंदिन आधारावर केले जाते. मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांसह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियमित आढावा बैठका घेतल्या जातात. विशेष मोहीम ३.० ने मंत्रालय/विभागांद्वारे ४,००० हून अधिक ट्विट, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या हँडलद्वारे २५० ट्विट, #SpecialCampaign3.0 वरील ३०० इन्फोग्राफिक्स आणि ११५ पीआयबी निवेदनानांसह समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधले आहे. (Special Mission 3.0)

२-७ ऑक्टोबर, २०२३ पासून विशेष मोहीम ३.० च्या पहिल्या आठवड्यात, खालील प्रगती साध्य केली आहे:

विशेष मोहिमेचा अवलंब केल्यामुळे गेल्या काही वर्षांतील प्रलंबिततेत घट झाल्याबद्दल डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रशंसा केली आणि दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस ५० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना ही गती कायम ठेवण्याचे आवाहन केले. विशेष मोहीम ३.०, ३१ ऑक्टोबर २-२३ रोजी तर मूल्यमापन टप्पा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात समाप्त होईल. (Special Mission 3.0)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.