राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षावर सोमवारी (९ ऑक्टोबर) पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव असल्याचं सांगत एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही, राष्ट्रवादीमध्ये हेच सुरू होतं असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) गटाने केला. शरद पवार हे (Sharad Pawar) घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, पक्षात लोकशाहीचा अभाव होता असा मोठा दावा अजित पवार गटाने केला आहे. तसेच आमदारांची संख्या आपल्याकडे मोठी आहे, त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर पुन्हा सुनावणी सुरू असून अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येत आहे. (Sharad Pawar Vs Ajit Pawar)
पुन्हा एकदा निवडणूक आयोगापुढे सुनावणीला सुरुवात झाली आहे. यासंबंधी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाने शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत त्यांच्यावर पक्षाचा कारभार एककल्लीपणे चालवण्याचा आरोप केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावे अशी मागणीही केली होती. त्यावर शरद पवार गटाने जोरदार हरकत घेतली होती. तसेच आयोगाला आगामी निवडणुकांपर्यंत पक्षाचे चिन्ह न गोठवण्याची विनंती केली होती.
निवडणूक आयोगाच्याया सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष व निवडणूक चिन्ह कुणाचे? यावर ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार गटाने जोरदार तयारी केली आहे. पवार गटाने या प्रकरणी जवळपास ९ हजार शपथपत्र दाखल केल्याची माहिती आहे. हा आकडा अजित पवार गटाहून जास्त असल्याचा दावा केला जात आहे. पण अजितदादांच्या गटात लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचा आकडा जास्त असल्यामुळे ते पवारांवर वरचढ ठरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा :Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला, मुख्यमंत्र्यानी दिले हे आदेश)
आतापर्यंतचे अपडेट्स
- प्रफुल्ल पटेल यांच्या सहीने सर्व निवडणूका झाल्या, आमच्या नेमणूकात व कागदपत्रात कुठलिही चूक नाही- अजित गट
- शरद पवारांची निवड नियमांना धरून नाही- अजित गटाचा युक्तिवाद
- पदाधिकाऱ्यांच्या सतत नेमणुका व्हायच्या, निवडणूका नाही, अजित गटाचा युक्तिवाद
- शरद पवार घर चालवतात, तसा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतात, अजित पवार गटाचा आरोप
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून, आमचाच गट खरा पक्ष आहे, असा दावा अजित पवार गटाने केला.
- पक्षाच्या कामकाजात लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप अजित पवार गटाने केला.
या घटनाक्रमानंतर या गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्हावर दावा सांगितला. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यानुसार, निवडणूक आयोग या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेऊन राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह कुणाचे यावर फैसला देणार आहे. ही सुनावणी यापुढेही लांबण्याचीही शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.