Bangladeshi National Sex Racket Busted : बांग्लादेशी घुसखोरांचे सेक्स रॅकेट उध्वस्त, ७ बांगलादेशी तरुणींची सुटका, ५ बांग्लादेशी दलालांसह ६ जणांना अटक

भारतात बांग्लादेशी घुसखोरांचे (Bangladeshi National) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे.

293
Bangladeshi National Sex Racket Busted : बांग्लादेशी घुसखोरांचे सेक्स रॅकेट उध्वस्त, ७ बांगलादेशी तरुणींची सुटका, ५ बांग्लादेशी दलालांसह ६ जणांना अटक
Bangladeshi National Sex Racket Busted : बांग्लादेशी घुसखोरांचे सेक्स रॅकेट उध्वस्त, ७ बांगलादेशी तरुणींची सुटका, ५ बांग्लादेशी दलालांसह ६ जणांना अटक

भारतात बांग्लादेशी घुसखोरांचे (Bangladeshi National) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. मजुर, फेरीवाले पाठोपाठ बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या देहव्यापारात (Prostitution) बांगलादेशी घुसखोरांनी शिरकाव केल्याचे ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत समोर आले आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी छापेमारी करून ‘सेक्स रॅकेट’ (Sex Racket) चा पर्दाफाश केला आहे. या छापेमारीत पोलिसांनी ७ बांगलादेशी तरुणींची सुटका करून ५ बांगलादेशी दलांलासह ६ जणांना अटक केली आहे. बांगलादेशी तरुणींना नोकरीचे अमिष दाखवून बेकायदेशीरपणे भारतात आणून त्यांना वेश्याव्यवसायात लोटले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. (Bangladeshi National Sex Racket Busted)

New Project 2023 10 09T194217.841

युनूस अखमल शेख उर्फ राणा (४०), साहिल मिजापुर शेख (२६), फिरदोस नुर हुसेन सरदार (२४), आयुबअली अजगरअली शेख (३५), बिपलॉप हापीजूर खान (२४) आणि योगेश बळीराम काळण (३१) असे अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी घुसखोरांसह स्थानिकाचे नाव आहे. पुण्यातील ‘फिडम फर्म’ (Feedam Firm) या सामाजिक संस्थेला (NGO) एक ईमेल आला होता. राणा नावाच्या इसमाने एका १९ वर्षीय बांगलादेशी तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून बांग्लादेशामधुन भारत देशामध्ये आणून डोंबिवलीच्या हेदुटणे (Dombivli Hedutane Villege) नावाच्या गावामध्ये तिला खोलीत डांबुन ठेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात येत आहे, या आशयाचा मेल या संस्थेला आला होता. संस्थेच्या समाजसेविकेने डोंबिबलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. (Bangladeshi National Sex Racket Busted)

(हेही वाचा – Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार यांची नियुक्ती घटनेच्या विरोधात)

मानपाडा पोलिसांनी एक पथक तयार करून डोंबिवलीतील हेदुटने या गावात असणाऱ्या एका घरात छापा टाकला असता या घरात ७ तरुणी मिळून आल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या सातही जणी बांगलादेशच्या नागरिक असून त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नाही, या तरुणींना युनूस अखमल शेख उर्फ राणा हा नोकरीचे आमिष दाखवून बांग्लादेश येथून बेकायदेशीररित्या घेऊन आला व त्याने त्यांना वेश्याव्यवसायात लोटले. पाचही आरोपी हे पलावा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी पलावा सिटी (Palava City) येथे शोध घेतला असता आरोपीनी तेथून पळ काढुन अतरली गावा जवळ असलेल्या झुडुपात लपले होते. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या विरुद्ध भादवि (IPC) कलम ३७६ (२) (एन), ३७०, ३७० (अ), ३६५, ३६६, ३६६ (ब), ३६३, ३४४, ३२३, ३४, सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ४, ५ परदेशी नागरीक कायदा १९४६ चे कलम ३, १४ (अ), १४ (क) सह पारपत्र नियम (भारत प्रवेश) कलम ४, प्रमाणे गुन्हा दाखल करून एकुण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Bangladeshi National Sex Racket Busted)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.