BJP Candidates : भाजपची १६२ उमेदवारांची यादी जाहीर

मामाजी बुधनीतून, तर रमनसिंग राजनांदगावमधून ताल ठोकणार

166
BJP Candidates : भाजपची १६२ उमेदवारांची यादी जाहीर
BJP Candidates : भाजपची १६२ उमेदवारांची यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाने सोमवारी (०९ ऑक्टोबर) मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह ५७ उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय, छत्तीसगड आणि राजस्थानमधील उमेदवारांची नावे सुध्दा जाहीर केली आहेत. (BJP Candidates)

भाजपने मध्यप्रदेशातील तिसऱ्या यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचेही नाव आहे. त्यांना बुधनी या मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा दतियाहून, गोपाल भार्गव रेहलीहून, विश्वास सारंग नरेला आणि तुळशीराम सिलावट यांना सांवेरमधून तिकीट देण्यात आली आहे. (BJP Candidates)

भाजपच्या ५७ उमेदवारांच्या या यादीत आरक्षित एससी आणि एसटी मतदारसंघातील सहा-सहा उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित ४५ उमेदवार सामान्य वर्गातील आहेत. महत्वाचे म्हणजे, आजच्या यादीत नऊ उमेदवार असे आहेत जे २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटवर निवडून आले होते. कालांतराने सर्व नऊ जणांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश आणि भाजपच्या तिकीटवर पुन्हा निवडून आलेत. (BJP Candidates)

(हेही वाचा – Israel Palaestine conflict : संपूर्ण गाझा पट्टी इस्रायलच्या ताब्यात ,३ लाख सैनिक तैनात)

राजस्थान

भारतीय जनता पक्षाने राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर केली. यात सात खासदारांसह ४१ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नाराजीमुळे राजस्थान सर्वाधिक चर्चेत होते. (BJP Candidates)

महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना सत्ताच्यूत करण्यासाठी भाजपने पहिल्या यादीत सात खासदारांना मैदानात उतरविले आहे. यात खासदार राज्यवर्धन राठोड (झोटवाडा), खासदार दीयाकुमार (विद्याधरनगर), बाबा बालकनाथ (तिजारा), नरेंद्रकुमार (मंडावा), देवजी पटेल (संचोरी), हसंराज मीना (सपोटरा) आणि किरोडीलाल मीना (सवाई माधोपूर) यांचा समावेश आहे. (BJP Candidates)

छत्तीसगड

भाजपने ११९ जागांच्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. यात ६४ उमेदवारांचा समावेश आहे. यात माजी मुख्यमंत्री रमनसिंग यांना राजनांदगावहून तिकीट दिले आहे. भाजपने छत्तीसगडच्या दुसऱ्या यादीत तीन खासदार, दोन माजी प्रशासकीय अधिकारी आणि नऊ महिलांचा समावेश आहे. याशिवाय, १९ जनजाती आणि नऊ अनुसूचित जातीच्या उमेदवारांची नावे सुध्दा या यादीत आहेत. (BJP Candidates)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.