MNS Toll naka Agitation : अविनाश जाधव याना ताब्यात घेताच, मनसेच्या आंदोलनाचा भडका उडाला

ठाण्याच्या आनंदनगर येथील मनसे कार्यकर्त्यांनी मुलुंड येथे टोलनाका पेटवला.

166
MNS Toll naka Agitation : अविनाश जाधव याना ताब्यात घेताच, मनसेच्या आंदोलनाचा भडका उडाला
MNS Toll naka Agitation : अविनाश जाधव याना ताब्यात घेताच, मनसेच्या आंदोलनाचा भडका उडाला

सोमवारी सकाळपासूनच टोलनाक्या प्रकरणी मनसे चांगलीच आक्रमक झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यातच मनसे नेते व ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलुंड टोल नाका येथील टोल चौकी पेटवली. या जाळपोळीत चौकीतील साहित्याचे नुकसान झाले. जाधव यांच्यासह मनसे पदाधिकारी अद्याप नवघर पोलिसांच्या ताब्यात आहेत. ठाणे आनंदनगर येथील मनसे शाखाध्यक्ष रोशन वाडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा टोलनाका पेटवल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुलुंड टोल नाका येथील पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. (MNS Toll naka Agitation)
ठाण्याच्या आनंदनगर येथील मनसे कार्यकर्त्यांनी मुलुंड येथे टोलनाका पेटवला. या घटनेनंतर पोलिसांनी टोल नाक्यावरील पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आल्यासंबंधीची व्हिडीओ वाहन चालकांना दाखवून टोल न भरण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी करत होते. त्यानंतर टोलनाक्यावर दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मनसेचे अविनाश जाधव, रवींद्र मोरे, पुष्करराज विचारे, संदीप साळुंखे, सत्यवान दळवी यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोल दरवाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

(हेही वाचा : India Vs Pakistan World Cup 2023 : इंडिया -पाकिस्तान सामन्यासाठी भारताची यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी टोलदरवाढी विरोधात मुंबईत पत्रकार परिषद घेतल्यानंतर शहरातील विविध टोलनाक्यावर याप्रश्नी पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. टोल हा एक मोठा घोटाळा, भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. टोल दरवाढ मागे न घेतल्यास टोलनाके जाळून टाकू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर मुलुंड टोल नाका येथे प्रतीकात्मक आंदोलन करणाऱ्या मनसे नेते व ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलुंड टोलनाका येथील टोलचौकी सोमवारी सायंकाळी पेटवली. या जाळपोळीत चौकीतील साहित्याचे नुकसान झाले. जाधव यांच्यासह मनसे पदाधिकारी अद्याप नवघर पोलिसांच्या ताब्यात असल्याने मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांच्या रागाचा भडका उडाला. या जाळपोळीचे पडसाद मुंबईतील इतर टोलनाक्यांवर उमटण्याची शक्यता आहे. (MNS Toll naka Agitation)

काय म्हणाले अविनाश जाधव
‘मला अटक करण्यात आली आहे. मला मेडिकलला घेऊन जात आहेत. माझ्यासह १२ जणांना अटक केलीये. आमची धरपकड करण्यापेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी जे म्हटलय, त्याचे जर पालन झाले तर धरपकड करण्याची गरज नाही’, अशी अविनाश जाधव यांनी अटकेनंतर प्रतिक्रिया दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.