World Cup 2023 : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय

न्यूझीलंडने आक्रमक फिल्डिंगचं प्रदर्शन करत नेदरलँडला धावा करू दिल्या नाहीत.

151
World Cup 2023 : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय
World Cup 2023 : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय

सध्या न्यूझीलंड आणि नेदरलँड (New Zealand vs Netherlands) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड कपचा (World Cup 2023) ६ वा सामना खेळवला गेला. हैदराबादमध्ये सोमवारी नेदरलँड्सचा न्यूझीलंड ने ९९ धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३२२ धावा चोपल्या. न्यूझीलंडला प्रत्युत्तर देताना नेदरलँडचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले, त्याला कारण न्यूझीलंडची फिल्डिंग. न्यूझीलंडने आक्रमक फिल्डिंगचं प्रदर्शन करत नेदरलँडला धावा करू दिल्या नाहीत.

३२३धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा डाव ४६. ३ षटकात २२३ धावांवर आटोपला. मिचेल सँटनर जबरदस्त फॉर्ममध्ये होता, त्याने न्यूझीलंडचे पाच विकेट्स घेतले. दरम्यान, मॅट हेन्रीने तीन विकेट्स घेत विजयाची गुंफण पूर्ण केली. डचसाठी कॉलिन अकरमनने ७३ चेंडूत ६९ धावा केल्या.सुरुवातीला, विल यंगच्या८० चेंडूत७० धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ५० षटकात ७ बाद ३२२धावा केल्या. दरम्यान, टॉम लॅथम (५३) आणि रचिन रवींद्र (५१) यांनीही अर्धशतके झळकावली. नेदरलँड्सच्या गोलंदाजी विभागासाठी रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकरेन आणि आर्यन दत्त यांनी अनुक्रमे प्रत्येकी दोन गडी बाद केले.

(हेही वाचा : MNS Toll naka Agitation : अविनाश जाधव याना ताब्यात घेताच, मनसेच्या आंदोलनाचा भडका उडाला

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.