ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल, आजारी शुभमन गिल संघाबरोबर नाही 

विश्वचषकातील पुढच्या सामन्यासाठी सोमवारी भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी संघाचं सराव सत्र आहे

127
ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल, आजारी शुभमन गिल संघाबरोबर नाही 
ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल, आजारी शुभमन गिल संघाबरोबर नाही 

ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना (ICC Cricket World Cup 2023) जिंकल्यानंतर भारतीय संघाकडे दुसऱ्या सामन्यापूर्वी फारसा वेळ नाही. ११ ऑक्टोबरला संघाचा पुढील सामना अफगाणिस्तान विरुद्ध नवी दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानावर होणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघ सोमवारी दुपारी नवी दिल्लीत पोहोचला. यावेळी भारतीय संघाबरोबर स्टार बॅट्समन शुभमन गिल मात्र नव्हता. शुभमन गिल अजूनही आजारी आहे. आणि तो चेन्नईतच बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

बीसीसीआयने सोमवारी संध्याकाळी पत्रक जारी करून शुभमनच्या प्रकृतीविषयी अपडेट दिला आहे. ‘शुभमन गिल सोमवारी ९ ऑक्टोबरला भारतीय संघाबरोबर प्रवास करणार नाही. (ICC Cricket World Cup 2023) सलामीवार फलंदाज रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळू शकला नव्हता. आता तो ११ तारखेच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही मुकणार आहे. तो सध्या चेन्नईत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे,’ असं या पत्रकात म्हटलं आहे.

(हेही वाचा- Health Tips :आपल्या शरीराला ठेवा हायड्रेटेड ,फॉलो करा या सोप्या टिप्स)

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ईशान किशनने रोहीत शर्मासह सलामी दिली. पण, बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडखानी करत ईशान पहिल्याच षटकात बाद झाला. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध त्याला पुन्हा संधी दिली जाते की, सुर्यकुमार यादव संघात येतो, हे पहावं लागणार आहे. शिवाय तीन फिरकी गोलंदाज खेळवण्या ऐवजी विकेट घेण्यात माहीर गोलंदाज शार्दूल ठाकूरचाही समावेश संघात होऊ शकतो. (ICC Cricket World Cup 2023)

सोमवारी दुपारी संघ दिल्लीत पोहोचला. तो प्रवासाचा दिवस असल्यामुळे खेळाडूंनी सराव केला नाही. सामनाही दिवस-रात्र असल्यामुळे संघाचं पहिलं सराव सत्र मंगळवारी संध्याकाळी ठेवण्यात आलंय.

अफगाणिस्तानच्या संघाने पहिला सामना बांगलादेश विरुद्ध गमावला होता. धरमशालाला झालेल्या या सामन्यानंतर संघाकडे सावरण्यासाठी चांगला वेळ होता. आणि भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. सोमवारी संध्याकाळी अफगाण संघाने फिरोजशाह कोटला मैदानावर कसून सराव केला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.