नुकतेच नांदेड, नंतर संभाजीनगर येथे सरकारी अनास्थेमुळे नवजात बालक व रूग्णांचा शासकीय रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू मोठया प्रमाणावर झाले ही वस्तुस्थिती असताना ज्यांचा या विभागाशी काही संबंध नाही त्यांनी सोमवारी यासंदर्भात सारवासारव करत एक जे संतापजनक उद्गार काढले ते केवळ निषेधार्ह नसून निंदनीय म्हणावे असेच आहेत.(Uday Samant)
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास वर्तुळातील समजले जाणारे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यासाठी खास एक पत्रकार परिषद घेत या मृत्यूवर अशी काही विचित्र टिप्पणी केली,’ ते म्हणाले एखादी घटना घडल्यावर तिला कायमस्वरूपी राजकीय वलय देऊन राज्याच्या प्रमुखांना व उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे नेते करत आहेत, ते योग्य नाही.
वस्तुतः पहायला गेले तर शासकिय रुग्णालयात जी औषध खरेदी तीही थोडी थोडकी न्हवे तर वार्षिक दीड हजार कोटी रुपयांमध्ये केली जाते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे खाते जरी त्यांचे नसले तरी मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी समजू यांनी केविलवाणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला देखील. पण यांनी अशावेळी आपले डोके कोणाकडे गहाण ठेवले होते. अरे म्हणे राजकारण….. ३०ते ३५च्या वर बालके दगावली….. तुमच्या पक्षाच्या खासदार नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या डीन ला बाथरूम साफ करायला लावले…. खरे तर यावर कार्यवाही अपेक्षीत असताना या सरकारचे उद्योगमंत्री याला राजकारण कसे आणि कोणत्या निर्ल्लज्ज तोंडाने म्हणू शकतात अशा संतापजनक प्रतिक्रिया आता सर्वसामान्य जनतेकडूनच उमटत आहेत.
(हेही वाचा-Navratri Garba : गरबा कार्यक्रमात अन्य धर्मियांना प्रवेश नको; विश्व हिंदू परिषदेने केली ‘ही’ मागणी)
मंत्री उदय सामंत पुढे असेही म्हणाले की, कोविड काळात अनेकांना सरकारविरोधात राजकारण करण्याची संधी होती.आम्ही सुद्धा राजकारण करू शकलो असतो.त्यावेळेस एकीकडे आम्हीच कोविड विरोधात सर्वोत्कृष्ट काम करत आहोत,असे तत्कालीन मुख्यमंत्री सांगायचे,तर दुसरीकडे देशात ५,३२,००० मृत्यू झालेत, त्यातील १,४८,५६१ महाराष्ट्रात झालेत.ही देखील माहिती आहे.
Join Our WhatsApp Communityकोविड काळात जेव्हा फिरायचे होते,तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री घरी बसून फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता मात्र दौरे करत आहेत.पण ते हे सोयीस्कररीत्या विसरले की त्याही सरकार मध्ये ते उच्च व तंत्रशिक्षण या मलईदार खात्याचे मंत्री होते. हेही सामुदायिक जबाबदारी समजून राज्यभरात फिरू शकले असते. पण हेही त्यावेळेस कोविड सेंटर आपल्या बगलबच्याना देण्यांत आकंठ बुडालेले होते याचा विसर त्यांना पडला का अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाच्या एका नेत्याने दिली.