Lasers And LED Lights Effects : नवरात्रीत डीजे, लेझर आणि LED लाईट्स असणार का; विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

120
Lasers And LED Lights Effects : नवरात्रीत डीजे, लेझर आणि LED लाईट्स असणार का; विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी
Lasers And LED Lights Effects : नवरात्रीत डीजे, लेझर आणि LED लाईट्स असणार का; विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

गणेशोत्सवानंतर अनेकांना नेत्ररोग आणि अन्य त्रास झाल्याचे दिसून आले होते. काही जणांना कायमचे अंधत्व आले होते. (Lasers And Led Lights Effects) डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून त्याचे स्पष्ट परिणाम गेल्या काही वर्षात दिसू लागले आहेत. त्यामुळे धोकादायक बनलेल्या डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाइटच्या वापरावर सार्वजनिक ठिकाणी कठोर निर्बंध आणण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. गणेशोत्सवात झालेल्या या प्रकारांमुळे नाशिकमध्ये डीजे आणि लेझरवर पोलीस आयुक्तालयाने यापूर्वीच निर्बंध घातले आहेत. तसेच नवरात्रोत्सवात (Navratri) लेझर आणि डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Navratri Garba : गरबा कार्यक्रमात अन्य धर्मियांना प्रवेश नको; विश्व हिंदू परिषदेने केली ‘ही’ मागणी)

अनेक मिरवणुकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये लेझर प्रकाशझोत आकाशाच्या दिशेने आणि जमलेल्या लोकांच्या अंगावरून फिरवला जातो.  लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटमुळे कायमचे अंधत्व येण्याचा धोका असतो. यंदा हिंजवडीत योगेश अभिमन्यू साखरे या तरुणाचा, तर तासगाव येथे शेखर सुखदेव पावशे या तरुणाचा डॉल्बीच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील दुधारी येथे ३५ वर्षीय प्रवीण शिरतोडेचाही असाच डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाला होता. (Lasers And Led Lights Effects)

ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटचा सार्वजनिक ठिकाणी वापर करण्याबाबत कठोर निर्बंध आणण्याची व याबाबतचे कठोर नियम  करण्याची मागणी अनेकांकडून होत आहे. सरकारने पुढाकार घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरकारने या मागणीची तातडीने दखल घेतली, तर येणाऱ्या नवरात्रीवरही याचे परिणाम दिसून येणार आहेत. (Lasers And Led Lights Effects)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.