अयोध्येतील राममंदिराच्या (Ayodhya Shri Ram Mandir) उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 100 दिवसांत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. श्री राम मंदिर बांधकाम समितीने मंदिर आणि मंदिराशी संबंधित कामांसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. मंदिराच्या बांधकामात गुंतलेल्या मजुरांची संख्याही वाढली आहे. राम मंदिराला आकार देण्यात सुमारे तीन हजार कामगार रात्रंदिवस गुंतलेले आहेत. 1 ऑक्टोबर ते 10 जानेवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची योजना आहे.
प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या आधी राम मंदिराचा (Ayodhya Shri Ram Mandir) तळमजला पूर्णपणे तयार असावा. तसेच प्रशासन आता प्रवासी सुविधा विकसित करण्याबाबत कठोर झाले आहे. येत्या 100 दिवसांच्या आत राम मंदिर आणि इतर प्रवासी सुविधा विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. राम मंदिराबद्दल बोलायचे झाले तर मंदिराच्या पहिल्या मजल्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
(हेही वाचा – Navratri Garba : गरबा कार्यक्रमात अन्य धर्मियांना प्रवेश नको; विश्व हिंदू परिषदेने केली ‘ही’ मागणी)
मंदिराबरोबरच प्रवासी सुविधा केंद्र, पार्किंग, श्री राम जन्मभूमी (Ayodhya Shri Ram Mandir) पथ, ओव्हरब्रिज इत्यादींचे देखील काम करण्यात येणार आहे. प्रत्येक १५ दिवसांनी मंदिराच्या कामाची आढावा बैठक होईल. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी मंदिर बांधकाम समिती आणि विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून योजनांचा आढावा घेतील आणि त्यावर देखरेख ठेवतील.
तसेच श्रीराम जन्मभूमी (Ayodhya Shri Ram Mandir) मंदिराच्या भव्य सिंहद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. साेबतच नृत्य मंडप, फरशीवरील नक्षीकामही अंतिम टप्प्यात आहे. राम मंदिर निर्माण ट्रस्टनुसार बांधकामात ३ हजार मजूर रात्रंदिवस व्यग्र आहेत.
२२ जानेवारी रोजी मंदिरात रामलल्ला (Ayodhya Shri Ram Mandir) यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी सुमारे १० हजार पाहुणे आणि दोन लाखांहून अधिक रामभक्त अयोध्येत पोहोचतील. यानंतर रामलल्ला दर्शन कार्यक्रमांतर्गत विश्व हिंदू परिषदेच्या सर्व ४४ प्रांतातून दररोज २५ हजार रामभक्त दर्शनासाठी येणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community