ऋजुता लुकतुके
बॉलिवूडच्या कित्येक अभिनेत्रींना या गाडीने भुरळ घातली आहे. रिचा चढ्ढा तर अनेकदा हीच गाडी चालवताना दिसते. अशी ही गाडी (BMW X6) आता भारतातही पुन्हा एकदा लाँच झाली आहे. आणि यावेळी कूप म्हणजे फक्त दोनच लोक बसू शकतील अशा गाडीच्या आकाराची ही एसव्हीयु गाडी व्हेलवेट रंगात उपलब्ध आहे.
ही गाडी आहे बीएमडब्ल्यू या लक्झरी कार कंपनीची बीएमडब्ल्यू एक्स६ (BMW X6) श्रेणीतील सुधारित कार. दोन वर्षांपूर्वी लाँच झालेल्या या कारचं रुपडं आता बदलण्यात आलंय. अर्थातच किंमतही बदललीय. आता या गाडीची किंमत विविध कर वगळून १ कोटी १० लाखांपासून सुरू होईल. तर सगळ्यात वरचं मॉडेल १ कोटी ११ लाखांना मिळेल. असं नेमकं काय आहे या गाडीत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
नवीन गाडीत ब्रेक यंत्रणा तसंच इतरही अनेक तांत्रक बदल करण्यात आलेत. गाडीची पुढची चाकं आता २१ इंचाची आणि मागील चाकं २२ इंचांची असतील. सुरक्षा आणि नवीन ब्रेक यंत्रणेसाठी हे बदल करण्यात आले आहेत. तर गाडीची डिकी क्षमता आता ५६० लीटर म्हणजे आधीच्या गाडीपेक्षा ५० लीटरनी कमी आहे.
गाडीत (BMW X6) केलेले अंतर्गत बदलही सुखावह आहेत. सनरुफचा आनंद आता वाढणार आहे. कारण, तिथून पॅनोरमिक व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. तर गाडीतील डिजिटल डिस्प्ले स्क्रीन १२.३ इंचांची असणार आहे. गाडीच्या आत वापरेलं लेदर उच्च दर्जाचं आहे.
(हेही वाचा-Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे ६० टक्के काम पूर्ण; जाणून घ्या कशी आहे तयारी?)
पूर्णपणे पेट्रोलवर चालणारी ही गाडी भारतातही सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. गाडीचं इंजिन २९९९ सीसी इतकं आहे. तर गाडीचा सर्वोच्च वेग २५० किमी प्रती तास इतका आहे. गाडी सुरू केल्यानंतर ५ सेकंदांमध्ये आपला सर्वोच्च वेग पकडू शकते. सध्या आठ रंगांमध्ये ही गाडी उपलब्ध आहे.
बीएमडब्ल्यू कंपनीने एसयुव्ही (BMW X6) श्रेणीतील ही कूप गाडी २००८ मध्ये पहिल्यांदा लाँच केली. लक्झरी कार क्षेत्रात तेव्हा एक्स १ श्रेणीतील कारने क्रांती घडवली होती. गाडीचं आकर्षक डिझाईन आणि क्षमता यामुळे इंजिनिअरिंगमधला अविष्कार असं गाडीचं वर्णन केलं गेलं होतं.
मर्सि़डिज, रोल्स रॉईस यांची स्पर्धा मोडून काढत ही गाडी तेव्हा विक्रीचे उच्चांक मोडत होती. तेव्हापासून आतापर्यंत एकट्या अमेरिकेत एक्स श्रेणीच्या ४,५०,००० च्या वर गाड्या विकल्या गेल्या आहेत. भारतात या गाड्यांचं उत्पादन कंपनीच्या चेन्नईतील कारखान्यात होतं.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community