Swimming pool: जलतरण तलावात क्लोरिन वायू पसरल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास, परिसरात वाहतूक बंद

संबंधित व्यक्तिंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

145
Swimming pool: जलतरण तलावात क्लोरिन वायू पसरल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास, परिसरात वाहतूक बंद
Swimming pool: जलतरण तलावात क्लोरिन वायू पसरल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास, परिसरात वाहतूक बंद

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा जलतरण तलावात (Swimming pool) आज धक्कादायक घटना घडली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावातून अचानक क्लोरिन गॅस लिक झाला. यामुळे तलावात पोहण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांना श्वसनाचा त्रास (Respiratory distress) सुरू झाला. ही घटना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

पिंपरी-चिंचवडमधील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या अनेक जणांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. खोकला येऊन घशाला त्रास होऊ लागला. त्यानंतर असे लक्षात आले की, जलतरण तलावातच नाही, तर ५०० मीटरपर्यंत असलेल्या लोकांनाही हा त्रास होऊ लागला.

(हेही वाचा – Lasers And LED Lights Effects : नवरात्रीत डीजे, लेझर आणि LED लाईट्स असणार का; विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी )

जलतरण तलावातील क्लोरीन गॅस लिक होऊन परिसरात पसरला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सुरू झाल्यामुळे कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस दाखल झाले असून संबंधित व्यक्तिंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.