ED Raids Amanatullah Khan : वक्फ बोर्ड आर्थिक अपहाराप्रकरणी ईडीची कारवाई; आपचे अमानतुल्ला खान का आले अडचणीत…

अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने आप नेते अमानतुल्ला खान यांच्या घरी धाड घातली

186
ED Raids Amanatullah Khan : वक्फ बोर्ड आर्थिक अपहाराप्रकरणी ईडीची कारवाई; आपचे अमानतुल्ला खान का आले अडचणीत...
ED Raids Amanatullah Khan : वक्फ बोर्ड आर्थिक अपहाराप्रकरणी ईडीची कारवाई; आपचे अमानतुल्ला खान का आले अडचणीत...

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १० ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टीचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकला. (ED Raids Amanatullah Khan) गेल्या वर्षी वक्फ बोर्ड प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात सापडलेल्या डायऱ्यांंमधील तपशीलानंतर ही कारवाई करण्यात आली. अमानतुल्ला खान यांच्या निकटवर्तियाकडून या डायरी सापडल्या आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षी छापेमारीत अनेक डायरी जप्त केल्या होत्या. यातील २ डायरींमध्ये हस्तलिखित नोंदी होत्या. दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मनी लाँड्रिंगअंतर्गत दाखल केलेल्या २ एफआयआर अंतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे. या एफआयआर दिल्ली वक्फ बोर्डातील नोकऱ्यांमधील अनियमिततेशी संबंधित आहेत. अमानतुल्ला खान हे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत. या प्रकरणी दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 ऑगस्ट 2022 रोजी अमानतुल्ला खान यांना अटक केली होती. 28 डिसेंबर 2022 रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली होती. (ED Raids Amanatullah Khan)

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इजिप्तने हमासच्या हल्ल्याची चेतावणी दिली होती का; काय म्हणाले पंतप्रधान नेतन्याहू

या दोन डायऱ्यांमध्ये मोठ्या रकमेच्या व्यवहारांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. काही व्यवहार जामिया क्षेत्रातील स्थानिक लोकांसोबत, काही इतर राज्यांतील लोकांसोबत आणि काही देशाबाहेर राहणाऱ्या लोकांसोबत केले गेले. या पैशांच्या व्यवहाराचा तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) पुरेशी संसाधने नसल्यामुळे ही माहिती ईडीला हस्तांतरित करण्यात आली, जेणेकरून ते या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करू शकतील.

सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वक्फ बोर्डातील घोटाळ्याबाबत स्वतंत्र एफआयआर नोंदवले होते. गेल्या वर्षी याच प्रकरणात एसीबीने अमानतला अटक केली होती. आता ईडीने मनी लाँड्रिंगअंतर्गत ट्रस्टच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीच्या टीमने आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापा टाकला होता. ईडीच्या पथकाने तेथूनही अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी संजय सिंह यांच्या घरावर ४ ऑक्टोबरला छापा टाकण्यात आला होता. (ED Raids Amanatullah Khan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.