Cabinet Decision : मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात ‘लेक लाडकी’ योजना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली

158
Cabinet Decision : मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात 'लेक लाडकी' योजना
Cabinet Decision : मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात 'लेक लाडकी' योजना
केंद्र आणि राज्य शासनाकडून नारी सन्मानासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना, महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबविण्याचा निर्णय (Cabinet Decision) घेतला आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे राज्यातील लेकी आता लखपती होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात कॅबिनेट बैठक आयोजित (Cabinet Decision) करण्यात आली. यावेळी सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण आखण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे जलविद्युतमध्ये मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय सांगली, अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये उभारण्यास मंजुरी देण्यात आली.

(हेही वाचा-Swimming Pool Gas Leak : स्विमिंग पूल मध्ये क्लोरीन गॅसची गळती; १० ते १२ जण बेशुद्ध)

कॅबिनेटमधील महत्त्वाचे निर्णय
● पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
* फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
* भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
* विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=eXlc_u07rgg

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.