ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटील (crime) यांच्या नातेवाईकांची आता चौकशी सुरू आहे. शनिवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ललित पाटील याच्या घरी धडक दिली. त्याचे आई-वडील, ललितची वकील मैत्रीण यांची पोलिसांनी चौकशी केली.
तसेच ललितचा भाऊ ड्रगमाफिया भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांच्याही नाशिकच्या घरी पोलीस चौकशीसाठी गेले होते. ड्रगमाफिया अभिषेक बलकवडे यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केल्या माहिती पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या ड्रगमाफिया यांच्या नातेवाईकांची चौकशी केली असता त्यांच्या आई-वडिलांनी आपली मुले आणि बलकवडेच्या पत्नीने आपली मुले काय करतात, याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले तसेच त्यांना ते दोघे कुठे आहेत, याविषयीही काहीच माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
(हेही वाचा – Swimming Pool Gas Leak : स्विमिंग पूल मध्ये क्लोरीन गॅसची गळती; १० ते १२ जण बेशुद्ध)
ललित पाटील हा तब्येत बरी नसल्याच्या कारणामुळे ससून रुग्णालयात उपचार घेत होता, मात्र तो रुग्णालयात राहून ड्रग रॅकेट चालवत होता. त्याचा भाऊ भूषण पाटील हा त्याला या कामाकरिता मदत करत असे, तर बलकवडे हा भूषणचा साथीदार आहे. हे तिघेही अद्याप फरार आहेत. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची १० पथके तैनात केली आहेत, मात्र अद्याप पोलिसांना याचा सुगावा लागलेला नाही.