-
ऋजुता लुकतुके
सोमवारी झालेला न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँडसचा सामना तिसऱ्या पंचांच्या एका निर्णयामुळे सध्या गाजतोय. विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स हा सामना पंचांच्या एका निर्णयामुळे लक्षात राहील. हैद्राबादमध्ये झालेल्या या सामन्यात तिसरे पंच होते जोएल विल्सन. सामन्यात नेदरलँड्सचा संघ किवी संघाच्या ३२२ या धावसंख्येचा पाठलाग करत होता. त्या दरम्यान ४१व्या षटकांत ती घटना घडली. डच फलंदाज सिब्रँड एंगेलब्रेश्त रचिन रवींद्रचा एक चेंडू खेळण्यासाठी पुढे सरसावला. चेंडू टोलवण्यासाठी एंगेलब्रेश्त क्रीझ सोडून खूप पुढे आलेला होता. चेंडू त्याच्या डाव्या बाजूने यष्टीरक्षकाकडे गेला. अर्थातच तो एक मोठा वाईड चेंडू होता. (ICC World Cup 2023)
पण, तोपर्यंत यष्टीरक्षकाकडे एंगेलब्रेश्तला यष्टीचीत करण्याची संधी होती आणि ती लॅथमने साधलीही. मैदानावरील पंचांनी चेंडू वाईड असल्याचा निर्वाळा दिला. पण, खेळाडू बाद आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांनी तो अजब निर्णय दिला. त्यांनी फलंदाज बाद नसल्याचा कौल दिला आणि तो चेंडूच नोबॉल ठरवला. नेमकं काय घडलं ते आधी पाहूया… (ICC World Cup 2023)
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इजिप्तने हमासच्या हल्ल्याची चेतावणी दिली होती का; काय म्हणाले पंतप्रधान नेतन्याहू)
हा निर्णय देताना पंच जोएल विल्सन जे बोलतायत ते स्पष्ट ऐकू येतंय. त्यांचा असा समज झालाय की, यष्टीरक्षक लॅथमने चेंडू यष्टींच्या मागे नाही तर पुढे पकडलाय आणि त्यामुळे तो नोबॉल ठरवायला हवा असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी तसा निर्णय दिलाही.
‘थोडं थांबा. रिप्ले पुन्हा दाखवा. मला वाटतं, चेंडू पकडताना यष्टीरक्षकाचे हात यष्ट्यांच्या पुढे आहेत. कुठे आहेत त्याचे ग्लव्ह मला पाहू दे. ते पुढे आहेत. म्हणजे हा नो-बॉल आहे. मग फलंदाज बाद नाही होऊ शकत,’ असा जोएल यांचा आवाज या व्हडिओतही ऐकू येत आहे. (ICC World Cup 2023)
तिसरे पंच जोएल यांनी हा निर्णय दिला तेव्हा न्यूझीलंडचे माजी फलंदाज इयान स्मिथ समालोचन करत होते. त्यांचा एकच भडका उडाला. चेंडू झेलताना लॅथम यष्टीच्या मागेच होता असं ते वारंवार सांगत होते. पण, क्रिकेटचे नियम बघितले तर जोएल यांचंच म्हणणं बरोबर होतं हे स्पष्ट होईल.
नियम असं सांगतो की, ‘गोलंदाजाने चेंडू फेकल्यापासून तो फलंदाजाच्या बॅटला लागेपर्यंत किंवा तो फलंदाजाच्या मागे जाईपर्यंत पूर्णवेळ यष्टीरक्षकाने यष्टीच्या मागेच राहिलं पाहिजे. त्याच्या शरीराचा किंवा ग्लव्हज, बूट आणि पॅड यांचा कुठलाही भाग यष्टीच्या पुढे येता कामा नये.’ आणि समालोचन करताना इयान स्मिथनेही, ‘लॅथमला हात सुरुवातीला यष्टीच्या पुढे असेलही असंच म्हटलं होतं.’ (ICC World Cup 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community