Israel-Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; काय झाले संभाषण

119
Israel-Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; काय झाले संभाषण
Israel-Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; काय झाले संभाषण

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. (Israel-Palestine Conflict) ही माहिती देतांना पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले की, “इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल मला अपडेट केल्याबद्दल मी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे आभार मानतो. या कठीण काळात भारतातील लोक इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.” (Israel-Palestine Conflict)

(हेही वाचा – Mumbai Congress : काँग्रेसच्या शिष्टमंडळाला महापालिका आयुक्तांनी दाखवली जागा)

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. मी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Israel-Palestine Conflict)

हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलला खंबीर पाठींबा व्यक्त केला होता. याला ‘दहशतवादी हल्ला’ म्हणत पंतप्रधान मोदींनी याचा तीव्र निषेध केला होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमचे विचार आणि प्रार्थना निष्पाप पीडित अन त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.’ इस्रायलचे भारतातील राजदूत भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलन यांनी यापूर्वी म्हटले होते की, त्यांच्या देशाला भारताच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे. भारत हा एक प्रभावशाली देश आहे आणि तो दहशतवादाचे आव्हान समजून घेतो. या संकटाचीही त्याला चांगली जाणीव आहे, असे ते म्हणाले होते. या वेळी हे अतिशय महत्त्वाचे आहे की, हमासचे अत्याचार बंद व्हावेत, यासाठी आम्हाला सर्व काही करण्याची क्षमता देण्यात आली आहे.”

नाओर गिलन म्हणाले होते, ”आम्हाला भारताकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. आम्हाला आशा आहे की, जगातील सर्व देश शेकडो इस्रायली नागरिक, स्त्रिया, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलांची बेहिशोबी हत्या आणि अपहरणाचा निषेध करतील.” (Israel-Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.