Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक अर्ध्या तासांत खुला, प्रवाशांची अडचण सुटली

Mumbai-Pune Expressway

118
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक अर्ध्या तासांत खुला, प्रवाशांची अडचण सुटली
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक अर्ध्या तासांत खुला, प्रवाशांची अडचण सुटली

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) आज पुन्हा विशेष ब्लॉक (special block) घेतला होता. या मार्गावरील काम पूर्ण झाल्यामुळे हा ब्लॉक आता संपला आहे. या मार्गावरील काम अर्ध्या तासात पूर्ण झाले आहे.

या मार्गावर ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला; कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, आयटीएमएस प्रणालीनुसार, यावेळी ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात आले. या काळात पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्याचबरोबर जुन्या मुंबई-पुणे महामार्गापासून शिंगरोबा घाटापर्यंत हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

(हेही वाचा – Mumbai Congress : काँग्रेसच्या शिष्टमंडळाला महापालिका आयुक्तांनी दाखवली जागा )

ITMS प्रकल्पांतर्गत बोरघाट परिसरात गॅन्ट्री बसवण्यात आली होती, त्यामुळे हे संकुल आता सीसीटीव्हीच्या (CCTV) निगराणीखाली येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसी (Maharashtra State Road Development Corporation) तसेच वाहतूक विभागाला एक्स्प्रेस वे (Expressway) बंद करण्याबाबत माहिती देण्यात आली. आज हा मेगाब्लॉक दुपारी 12 ते 2 या वेळेत लावण्यात आल्याने मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांना काही अडचणींना सामोरे जावे लागले. एमएसआरडीसी (MSRDC) विभागाने हे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक पूर्वपदावर आणली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.