Israel Palestine Conflict : हल्ल्यातून बचावलेल्या इसमाने सांगितला ‘त्या’ भयावह घटनेचा क्रम

136
Israel Palestine Conflict : हल्ल्यातून बचावलेल्या इसमाने सांगितला 'त्या' भयावह घटनेचा क्रम

आज म्हणजेच मंगळवार १० ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या दिवशी सुद्धा (Israel Palestine Conflict) इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील युद्ध सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत अनेक व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत. अशातच इस्त्रायलकडून गाझापट्टीत नागरी वस्त्या टार्गेट करण्यात आल्या. गाझापट्टीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. शनिवारी ७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यानंतर इस्रायलनेही चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून या युद्धाला सुरुवात झाली आहे.

अशातच इस्रायलमधील (Israel Palestine Conflict) एका संगीत महोत्सवात (रेव) हमासच्या दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्यांपैकी एक असलेल्या सहर बेन सेला याने हल्ल्यानंतर रुग्णालयात बरा होत असताना त्या भयानक घटनेचा क्रम सांगितला.

शनिवार ७ ऑक्टोबर वेळ- सकाळी ६:३०, ठिकाण- किबुत्झ रीम, इस्रायलचा सीमावर्ती भाग. इस्रायलच्या (Israel Palestine Conflict) नोव्हा म्युझिक फेस्टसाठी येथे जमलेल्या हजारो लोकांनी गाझा पट्टीतून आकाशात रॉकेट डागताना पाहिले. त्यांना हे सगळं काय होतंय हे समजण्यापूर्वीच हमासचे सैनिक मोटारसायकल, वाहने आणि ट्रॅक्टर घेऊन तेथे पोहोचले आणि त्यांनी वेगाने गोळीबार सुरू केला. लोकांमध्ये गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. रॉकेट हल्ले टाळण्यासाठी लपले. काही लोक जमिनीवर झोपले.

काही वेळातच आकाशातून हजारो रॉकेट इस्रायलच्या (Israel Palestine Conflict) दिशेने जाऊ लागले, जे कुठेही हल्ला करू शकत होते. रॉकेट हल्ल्यांदरम्यान हमासचे सैनिक पॅराग्लायडिंग, बाईक आणि कारने इस्रायलच्या हद्दीत घुसले होते. दरम्यान, संगीत महोत्सवाजवळील लष्करी तळावरही हल्ला करण्यात आला.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने उचलले हे पाऊल; वाढवली सुरक्षा )

त्यांनी संगीत थांबवले, आम्हाला सांगण्यात आले की आपत्कालीन सायरन वाजले आहेत आणि काही मिनिटांनंतर पार्टीचे निर्माते ओरडले की दहशतवादी आहेत. सहरने पुढे सांगितले की तो आणि इतर सुमारे 10 मित्र गाड्यांमध्ये चढले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि एका पोलिसाने त्यांना काँक्रीटच्या बॉम्ब शेल्टरमध्ये नेले. (Israel Palestine Conflict) “आम्ही जवळपास 30 जण होतो. काही मिनिटांनंतर दहशतवाद्यांनी आमच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि आमच्या अगदी समोर असलेल्या पोलिसाला ठार केले.

त्यांनी आमच्या दिशेने पहिला ग्रेनेड (Israel Palestine Conflict) फेकला जो आम्ही थांबलेल्या शेल्टरच्या समोर फुटला. एक मिनिट आरडाओरडा झाल्यानंतर त्यांनी आणखी एक ग्रेनेड फेकला जो माझ्या डोक्यावर आदळला. मी तिथे भिंतीजवळ उभा होतो आणि ग्रेनेड माझ्या पाठीमागील मृतदेहांवर उडाला आणि फुटला त्यामुळे आम्हाला वाचवण्यात यश आले.

अर्ध्या मिनिटानंतर, आमच्या एका मैत्रिणीने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, कारण (Israel Palestine Conflict) तिला आत गुदमरत होत. मी आणि तिच्या जोडीदाराने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला ते शक्य झाले नाही. ती थेट एका दहशतवाद्याच्या नजरेत आली आणि पॉईंट-ब्लँक रेंजवरून तिला गोळी मारण्यात आली. आमच्या डोळ्यादेखत ती गेली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.