Israel Palestine Conflict : मोसादकडून मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख; केले महत्त्वाचे ट्वीट

173
Israel Palestine Conflict : मोसादकडून मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख; केले महत्त्वाचे ट्वीट
Israel Palestine Conflict : मोसादकडून मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख; केले महत्त्वाचे ट्वीट

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला आहे. (Israel Palestine Conflict) हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्रायलवर अडीच हजारांहून अधिक रॅकेट्स डागून युद्धाला तोंड फोडले. गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे दोन्ही देशांतील १६०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला असून चहुबाजूंनी केवळ गोळीबाराचा आवाज येत आहे. गेले ४ दिवस चालू असलेले हे युद्ध अजूनही थांबण्याच्या स्थितीत नाही. या दरम्यान इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने एक ट्वीट करून आतंकवाद्यांच्या मानसिकतेविषयी भाष्य केले आहे. या वेळी त्यांनी मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला आहे. (Israel Palestine Conflict)

(हेही वाचा – Swiss Bank : विदेशात पैसे जमा करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार)

“पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय कोणत्याही दहशतवाद्याला समजून घेणं एखाद्या माणसासाठी कठीण आहे. मुंबई, इंडिया हॉटेल आणि चबड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला आठवतो? दहशतवादी हे रक्तपिपासू प्राणी असतात”, असे ट्वीट मोसादने केले आहे.

हमासकडून होत असलेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मोहम्मद देईफ आहे. मोहम्मद देईफ हा नवा ओसामा बिन लादेन असल्याचेही इस्रायलने म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे तो अपंग आहे. स्वतःच्या पायावरही उभा राहू शकत नाही. तरीही तो मोसादच्या तावडीतून सुटतो. इस्रायलने आता आतंकवादाच्या विरोधात निर्णायक लढा चालू केला आहे. (Israel Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.