क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे इस्त्रायलमध्ये युद्धाची धुमश्चक्री (Israel-Palestine Conflict) सुरू झाली. हमासचे दहशतवादी इस्त्रायलच्या सीमेत घुसले. त्यांनी इस्त्रायली नागरिकांवर अत्याचार सुरू केले. लोकांवर गोळीबार, अनेकांची कत्तल, इस्त्रायली महिलांचं अपहरण…अशा अमानुष परिस्थितीत इस्त्रायल सापडला. इस्त्रायलमध्ये या सर्व घडामोडी घडत असताना गाझा पट्टीत नेमकं काय घडतंय, याविषयीची माहिती एका महिलेने सोशल मिडियावर शेअर करून मदतीची याचना केली आहे.
लुबना नझीर असं या महिलेचं नाव आहे. ही महिला मूळची भारतातली आहे. लुबना आणि तिचं कुटुंब या युद्धजन्य परिस्थितीत गाझा पट्टीत अडकलं आहे. आमच्या कुटुंबाला इथून बाहेर काढा,अशी विनंती भारत सरकारकडे केली आहे.
VIDEO | “We are facing a brutal war here in Gaza, as everything is being bombarded and destroyed within seconds. We are paying the price of this conflict, with civilians being targeted everywhere. I have two families who ran away from their homes along with me. My house is now… pic.twitter.com/JGGlx9OhOt
— Press Trust of India (@PTI_News) October 10, 2023
गाझा पट्टीत वीज, पाणी, इंटरनेट सेवा बंद आहे. या महिलेने एलिव्हेटेड इंटरनेटच्या साहाय्याने एक व्हिडियो संदेश सोशल मिडियावर पोस्ट करून त्यात म्हटले आहे की, आम्हाला कुठेही जाता येत नाहीए, कारण गाझा पट्टीत कुठेही सुरक्षित जागा उरलेली नाही. चोहोबाजूला अनांगोंदी माजली आहे. गाझा पट्टी खूप लहान आहे. गाझा पट्टीची सर्व बाजूंनी नाकेबंदी झाली आहे. मी आधीच भारताची मदत मागितली आहे. रमाल्लाह येथील भारताच्या प्रतिनिधींनी आम्हाला सुरक्षित स्थळी जाण्यासाठी मदत करावी. अशी विनंती तिने या व्हिडियोद्वारे करून सांगितले आहे की, ‘मी आणि माझे पती गाझा पट्टीत राहते. आम्ही क्रूर युद्धाचा सामना करत आहोत. सर्व काही अवघ्या काहीच क्षणांत उद्ध्वस्त होत आहे. सगळीकडे सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. सध्या माझ्याबरोबर २ कुटुंब आहेत. जे त्यांच्या घरातून पळून आले आहेत. त्यांच्या घरातल्या २२ लोकांना एका झटक्यात मारून टाकण्यात आलं. इथे वीज नाही, पाणी नाही, इंटरनेट नाही. मी माझं एलिव्हेटेड इंटरनेट वापरून दूतावासाशी संपर्क करत साधण्याचा प्रयत्न करत आहे.’