Sextortion : ‘सेक्सट्रोशन ने घेतला रेल्वे कर्मचाऱ्याचा बळी

माटुंगा रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या

181
Sextortion : 'सेक्सट्रोशन' ने घेतला रेल्वे कर्मचाऱ्याचा बळी
Sextortion : 'सेक्सट्रोशन' ने घेतला रेल्वे कर्मचाऱ्याचा बळी

सोशल मीडियावरील सेक्सट्रोशनने (sextortion) ३६ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचा (railway employee sucide) बळी घेतल्याची घटना माटुंगा रेल्वे स्थानकात (matunga railway station) घडली. जगदीश डाबी असे या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव असून सेक्सट्रोशन कॉलला कंटाळून सोमवारी त्याने माटुंगा येथे ट्रेनखाली आत्महत्या केली. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी (DADAR GRP) आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एका महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Sextortion)

जगदीश डाबी हे पत्नी आणि दोन मुलांसह डोंबिवली पूर्व नांदीवली येथे राहण्यास होता. मूळचा गुजरात राज्यातील जगदीश हा मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉप (matunga railway workshop) मध्ये नोकरीला होता. गेल्या महिन्याभरापूर्वी जगदीश याने फेसबुकवर आलेली एका अनोळखी महिलेची रिक्वेस्ट स्वीकारली होती. त्यानंतर या महिलेने ऑनलाइन सेक्सच्या नावाखाली जगदीश डाबी याचे अश्लील व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल (blackmail) करायला लागली. (Sextortion)

(हेही वाचा – Israel-Palestine War : कोण आहे नवा ओसामा बिन लादेन; इस्रायलची संशयाची सुई ‘या’ आतंकवाद्याकडे)

जगदीश याने व्हिडीओ व्हायरल होऊ नये म्हणून या अनोळखी महिलेच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर वेळोवेळी २ लाख रुपये पाठवले होते. त्यानंतर देखील या अनोळखी महिलेसह इतर दोघे त्याला कॉल करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत पैशांची मागणी करीत होते. अखेर या त्रासाला कंटाळून जगदीश याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट बनवली. (Sextortion)

या सुसाईड नोट मध्ये एका महिलेसह तीन जणांच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी आता पर्यंत दिलेल्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहित सुसाईड नोट खिशात ठेवली. सोमवारी कामावरून सुटल्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जगदीश याने माटुंगा रेल्वे स्थानकवरील सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या स्लो ट्रेन खाली स्वतः ला झोकावून देत आत्महत्या केली, अशी माहिती दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अनोळखी महिलेसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (Sextortion)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.