Supriya Sule : शाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाची सुप्रिया सुळेंनी घेतली दखल

ट्विटरवर पोस्ट करून सरकारला दिला सल्ला

207
Supriya Sule : शाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाची सुप्रिया सुळेंनी घेतली दखल
Supriya Sule : शाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाची सुप्रिया सुळेंनी घेतली दखल

पुण्यातील एका शाळेच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळेत विद्यार्थ्यांचा गोंधळ, मस्ती करणे, अशा घटना घडतच असतात, मात्र या शाळेत घडलेल्या कृत्याबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारला सल्ला दिला आहे.

पुण्यातील मुक्तांगण इंग्लीश मीडियम स्कूलमधील (Muktangan English Medium School) वरच्या वर्गातील मुले त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे उघडकीस आले आहे. पालकांनी याबाबत व्यवस्थापनाकडे तक्रार केली. पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार, ७ ते ८ मुलांचं लैंगिक शोषण (Sexual abuse of female students) त्याच शाळेतील मुलांनी केल्याचा आरोप आहे. वरच्या वर्गात शिकत असलेल्या मुलांनी वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पालकांनी केला.

(हेही वाचा – Tourism Development : कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा)

या मुलांच्या आरोपानंतर पालक आणि मनसे कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारात आंदोलन करून काही वेळ शाळा बंद केली होती. याबाबत पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंद घेण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन थांबवण्यात आले.

हे प्रकरण खासदार सुप्रिया सुळे यांना कळताच त्यांनी या प्रसंगाची दखल घेऊन ट्विटरवर लिहिले आहे की, पुण्यातील एका शाळेत लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलिसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाचीदेखील येथे आवश्यकता आहे. पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.