Meri Mati Mera Desh : मुंबईतील सर्व कलशांमधील माती एकत्रित एकाच कलशात, कार्यक्रमात विद्यार्थी वर्गांचा मान पालकमंत्र्यांसह आमदारांना

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवला असून मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमधून प्रत्येकी एक अमृत कलश गोळा करण्यात आले आहेत.

437
Meri Mati Mera Desh : मुंबईतील सर्व कलशांमधील माती एकत्रित एकाच कलशात, कार्यक्रमात विद्यार्थी वर्गांचा मान पालकमंत्र्यांसह आमदारांना
Meri Mati Mera Desh : मुंबईतील सर्व कलशांमधील माती एकत्रित एकाच कलशात, कार्यक्रमात विद्यार्थी वर्गांचा मान पालकमंत्र्यांसह आमदारांना

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबवला असून मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमधून प्रत्येकी एक अमृत कलश गोळा करण्यात आले आहेत. या सर्व कलशांमधील माती एकाच कलशामध्ये एकत्रित करण्याचा कार्यक्रम बुधवारी होणार आहे. मात्र, हा कार्यक्रम शालेय विद्यार्थी, स्काऊट अँड गाईड, अंगणवाडी कर्मचारी तसेच इतर युवकांच्या सक्रीय सहभागातून करण्याचे स्पष्ट निर्देश असताना महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी यामध्ये चक्क मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग हा येत्या २७ ऑक्टोबर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक असताना आयुक्तांनी छोट्या कार्यक्रमात लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून एकप्रकारे केंद्राच्या आदेशाचेच उल्लंघन करत आपल्याच अधिकारात कार्यक्रमाची रुपरेषाच बदलून टाकल्याचे दिसून येत आहे. (Meri Mati Mera Desh)

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने होत आहे. बुधवारी ९ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत या अभियानाचा मुख्य सोहळा पार पडला होता. यानुसार मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील माती एका कलशात जमा करून हे सर्व अमृत कलश महापालिका मुख्यालयात जमा करून ठेवण्यात आले आहे. (Meri Mati Mera Desh)

(हेही वाचा – ED Action : मनी लॉंड्रिंग प्रकरणात व्हिवो आणि लाव्हा मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अटक)

या सर्व अमृत कलशांमधील माती एकाच कलशात एकत्रित करण्याचा मुख्य कार्यक्रम बुधवारी दुपारी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पार पडला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी महापालिका मुख्यालयातील सर्व जमा करण्यात आलेले कलश हे बुधवारी सकाळी सजवलेल्या ट्रकमधून भायखळा येथील नाट्यगृहात नेले जातील आणि तिथे सर्व कलशांमधील माती एकाच कलशात एकत्रित केली जाणार आहे. हा कार्यक्रम कलशातील माती किंवा तांदळाचे एकत्रिकरण उत्सवाच्या वातावरणांमध्ये करणे. तसेच सर्व शहिदांचे स्मरण करावे. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एन. एस. एस. एन. सी, एनएसवायकेएस, भारत स्काऊट अँड गाईड्स, अंगणवाडी कर्मचारी आणि इतर युवक स्वयंसेवक यांच्या सक्रिय सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयोजन तालुका स्तरावर करावे, अशाप्रकारचे निर्देश केंद्र सरकारचे आहेत. (Meri Mati Mera Desh)

त्यामुळे बुधवारी होणारा कार्यक्रम हा विद्यार्थी वर्ग आणि अंगणवाडी कर्मचारी वर्ग यांच्यासमवेत होणे आवश्यक असताना या कार्यक्रमामध्ये महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दोन्ही पालकमंत्र्यांसह मुंबईतील सर्व आमदार लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. त्यामुळे केंद्राच्या मार्गदर्शक धोरणानुसार हा कार्यक्रम महापालिकेने आयोजित न करता लोकप्रतिनिधींचा सहभागाने हा कार्यक्रम घेऊन एकप्रकारे केंद्राच्या मार्गदर्शक निर्देशांचे उल्लंघन केले जात असल्याचे बोलले जात आहे. (Meri Mati Mera Desh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.