Beauty Tips : चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात, ‘ही’ योगासने करा

शरीराला आराम देण्यासोबतच या आसनांमुळे चेहरा चमकदार होतो

186
Beauty Tips : चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात, 'ही' योगासने करा
Beauty Tips : चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात, 'ही' योगासने करा

वय वाढल्यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावरील चमकदारपणा (Beauty Tips) कमी होऊन सुरकुत्या पडू लागतात, पण हल्ली तर वय कितीही असो कोणत्याही वयाच्या व्यक्तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात. यावर उपाय म्हणून महागड्या क्रीम्स आणि सौंदर्य उत्पादनांवर पैसे खर्च केले जातात. ताणतणाव, अतिव्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे त्वचेच्या समस्या वाढतात. त्याचा चेहऱ्यावरही परिणाम दिसतो. कामात होणारे बदल, अतिव्यस्त जीवनशैली, शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. यावर उपाय म्हणून काही विशिष्ट प्रकारची योगासने केल्यासही या सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. यामुळे चेहरा चमकदार होतो. चेहऱ्यावरील ग्लो वाढू शकतो.

हलासन
हलासन केल्याने शरीरातील रक्त चेहरा आणि डोक्याकडे जाते. त्यामुळे चेहऱ्याची चमक वाढते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा निरोगी, चमकदार बनते.

त्रिकोणासन
त्रिकोणासन करतानाही रक्ताचा प्रवाह डोके आणि चेहऱ्याकडे होतो. त्यामुळे त्वचेला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळू लागतो आणि चेहराही उजळतो. हे आसन ताणतणाव दूर होण्यासाठी उपयुक्त ठरतो. आणि चेहऱ्यावर सुरकत्या कमी करण्यासाठी मदत करते.

मत्स्यासन
मत्स्यासन करताना व्यक्ती डोक्याच्या मदतीने खांदा आणि कंबर वर करून संतुलन साधते. त्यामुळे रक्ताचा प्रवाह डोक्याकडे सुरू होतो. शरीराला आराम देण्यासोबतच या आसनामुळे चेहराही चमकतो. या आसनामुळे शरीरात ऊर्जा वाढते. शरिरातील विषारी घटक या आसनाने बाहेर पडतात, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.