Maharashtra Politics : वारशाचा दावा करणाऱ्यांनी आधी आरसा पहावा; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

223
CM Eknath Shinde : त्यांची अवस्था अहंकारी रावणासारखी होईल!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
CM Eknath Shinde : त्यांची अवस्था अहंकारी रावणासारखी होईल!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे, की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. (Maharashtra Politics)

छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे. कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच असल्याचेही शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Mumbai Dengue-Malaria : ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात डेंगीचे २५० तर हिवतापाचे २११ रुग्ण)

ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून हिदूत्वाची अँलर्जी असलेल्या काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती. त्यामुळे आझाद मैदान आणि क्रॉस मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.