Health Tips : दररोज डोळ्यांची काळजी कशी घ्याल ? जाणून घ्या…

173
Health Tips : दररोज डोळ्यांची काळजी कशी घ्याल ? जाणून घ्या...
Health Tips : दररोज डोळ्यांची काळजी कशी घ्याल ? जाणून घ्या...

डोळ्यांचे सौंदर्य चेहऱ्याच्या सौंदर्यातही भर घालते. अतिशय संवेदनशील, नाजूक अवयव असल्यामुळे डोळ्यांची काळजी (Health Tips) घेणे आवश्यक आहे. शरीरातील सर्वात जास्त संवेदनशील त्वचा डोळ्यांभोवती असते. त्यामुळे त्याची काळजी योग्य प्रकारे घेणे आवश्यक आहे. धूर, धूळ, प्रदूषण, मोबाइलचा सतत वापर यामुळे डोळ्यांना अ‍ॅलर्जीचा त्रास होतो. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात.

यासाठी

– चेहेरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये.

– डोळ्यांना सतत आयलायनर, मस्कारा वापरू नये.

– जवळून सतत मोबाइल वापरू नये.

– अंधारात टीव्ही किंवा मोबाइल पाहू नये.

(हेही वाचा – Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा; २३६९ गावांमध्ये रणधुमाळी)

काय कराल ?

  • बाहेर उन्हात जाताना डोळ्यांवर गडद रंगाचा चष्मा किंवा गॉगल वापरावा.
  • दिवसातून ३-४ वेळा डोळे थंड पाण्याने धुवावेत.
  • रात्री झोपताना नियमाने डोळय़ांना केलेला मेकअप काढावा आणि मॉईश्चरायझर लावावे.
  • रात्री झोपताना नरिशिंग व रिपेअर करणाऱ्या क्रीमचा वापर करावा.
  • योग्य अंतरावरून टीव्ही पहावा.
  • डोळ्यांचे व्यायाम करावेत.
  • काकडीचे काप, कोरफड गराचे आयपॅड थंडाव्यासाठी डोळय़ांवर ठेवावेत.
  • लोहाच्या कमतरतेमुळे डोळय़ांखाली काळी वर्तुळे येतात, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ल घेऊन औषधोपचार करावेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.