Israel-Palestine Conflict : इस्रायल-हमास यु्द्धाची धुमश्चक्री सुरूच, 3000 जणांचा मृत्यू

155
Israel-Palestine Conflict : इस्रायल-हमास यु्द्धाची धुमश्चक्री सुरूच, 3000 जणांचा मृत्यू
Israel-Palestine Conflict : इस्रायल-हमास यु्द्धाची धुमश्चक्री सुरूच, 3000 जणांचा मृत्यू

हमासेने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला आणि या दोन्हींमध्ये युद्धाला सुरुवात झाली. आज, बुधवारी या युद्धाचा पाचवा दिवस आहे. आतापर्यंत या युद्धात 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली (Israel-Palestine Conflict) नागरिक तसेच सैनिकांचा समावेश आहे.

आतापर्यंत इस्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनींसह 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी, 10 ऑक्टोबरला हमासने इस्रायलच्या अश्कलोन शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. दुसरीकडे इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करत बॉम्बचा वर्षाव करत आहेत. या संघर्षात दोन्हींकडील स्थानिक नागरिकांचेही हाल होत असल्याचे समोर आलं आहे.

(हेही – Israel-Palestine War : 35 एकर जमीन, 75 वर्षांचा इतिहास, 3 धर्मांचे दावे; ‘हे’ आहे इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे मूळ)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलला शस्त्र सामग्री पुरवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासोबत फोनवरून चर्चा करून इस्त्रायलच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. युद्धात दोन्ही बाजूंचे 4000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि भारतात नियुक्त इस्रायलचे कॉन्सुल जनरल टॅमी बेन-हैम यांच्या प्रतिक्रिया पीटीआय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केल्या

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.