Satara : नवविवाहिता दरीत कोसळली, महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट येथे सेल्फी काढताना मृत्यू

164
Satara : नवविवाहिता दरीत कोसळली, महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट येथे सेल्फी काढताना मृत्यू
Satara : नवविवाहिता दरीत कोसळली, महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट येथे सेल्फी काढताना मृत्यू

महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॉईंट येथे परिसरात दुर्दैवी घटना घडली. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन एका महिलेचा मृत्यू झाला.

पुणे येथील अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (२३, रा. धनकवडी, पुणे) ही नवविवाहिता तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली. तिचे पती सुनील ज्ञानदेव शिरस्कर (३०) रेल्वेमध्ये लोको पायलट आहेत. हे पर्यटक दाम्पत्य सोमवारी, ९ ऑक्टोबरला दुचाकीवरून दोन दिवसांसाठी महाबळेश्वर येथे गेले होते. सोमवारी विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. दुपारी जेवण करून पुणे येथे जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू केला होता. महाबळेश्वरपासून सहा किलोमीटर आले असता पतीकडे पत्नीने पुन्हा केट्स पॅाईंट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पतीने मात्र पुण्याचा लांबचा प्रवास दुचाकीवरून करावयाचा आहे. खूप वेळ जाईल म्हणून केट्स पॅाईंट न पाहता जाऊ असे अंकितास सुनील याने सांगितले, परंतु तिने हट्ट धरल्याने पती सुनीलचा नाईलाज झाल्याने हे दांपत्य दुपारी साडेचार वाजता केट्स पाँईट येथे पोहचले.

(हेही वाचा – Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा; २३६९ गावांमध्ये रणधुमाळी)

केट्स पॉईंट पाहून ते निडल होल व परिसरातील धबधबा पाहण्यासाठी पाईंटवरील सुरक्षा कठड्यावर बसून त्यांनी फोटो व व्हिडीओ काढले, असाच एक धबधब्याचा फोटो व व्हिडीओ घेताना अंकिता कठड्यावरून थेट तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातात ती जागीच ठार झाली. पत्नी कोसळताच पतीने आरडाओरडा सुरू केला.

हा गोंधळ ऐकून स्थानिकांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती स्थानिकांनी महाबळेश्वर व पाचगणी पोलीस ठाण्यासह वनविभाग, महाबळेश्वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्स यांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वनविभागाचे अधिकारी व जवानांनी अपघातस्थळी धाव घेतली.

पाचगणी पोलीस ठाण्याचे राजेश माने, महाबळेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक रौफ ईनामदार, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, महाबळेश्वर ट्रेर्कसचे सुनील बाबा भाटिया व सह्याद्री ट्रेर्कसचे संजय पार्टे यांच्यासह टीमने ५.३० वाजता मदतकार्यास सुरुवात केली. यावेळी ट्रेकर्सचे जवानांनी तीन पथके तयार केली. एक पथक मुख्य ठिकाणी दुसरे पथक रोपच्या सहाय्याने घटनास्थळावर पोहचले, तर तिसरे पथक केट्स पॅाईंटवरून डोंगर उतरून घटनास्थळी पोहोचले. दोन ते अडीच तासांनंतर मृतदेह दरीतून वर काढण्यात यश आले. पती सुनील शिरस्कर यांच्यासोबत १० महिन्यांपूर्वीच अंकिताचे लग्न झाले होते. सुनील यांना कामावरून सुट्टी मिळत नव्हती. डिसेंबर २०२३मध्ये तो पुढील प्रशिक्षणासाठी भुसावळला जाणार होता. त्यापूर्वी पती-पत्नींनी महाबळेश्वरला जाण्याचा बेत आखला आणि यातच तिचा मृत्यू झाला. अंकिताचे संसाराचे स्वप्न अधुरे ठरले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.