India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विराट आणि नवीन उल हकमधील द्वंद्वावर सगळ्यांचं लक्ष 

यावर्षीच्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामधील भांडण चांगलंच गाजलं. आज दोघंही आपल्या राष्ट्रीय जर्सीत आमने सामने येतील. आणि दोघांचा आक्रमक स्वभाव बघता आज दोघांचा मूड कसा असेल यावर चर्चा सुरू आहे

149
India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विराट आणि नवीन उल हकमधील द्वंद्वावर सगळ्यांचं लक्ष 
India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विराट आणि नवीन उल हकमधील द्वंद्वावर सगळ्यांचं लक्ष 

ऋजुता लुकतुके

भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) दरम्यानच्या विश्वचषक सामन्याच्या निमित्ताने भारतीय मीडियात सध्या दोन गोष्टींची चर्चा होत आहे. एक म्हणजे ज्या प्रकारे मागच्या सात वर्षांत अफगाणिस्तानने क्रिकेटमध्ये प्रगती केली आहे. एकेकाळी पात्रता फेरीतून मग मुख्य स्पर्धेत जागा मिळवणाऱ्या या संघाने यंदा थेट प्रवेश मिळवला आहे. आणि ते ही देशांतर्गत परिस्थिती फारशी चांगली नसताना. संघ तिथल्या अस्थिरतेमुळे मायदेशात सरावही करू शकत नाही. असं असताना क्रिकेट संघाने मात्र अंगभूत गुणवत्तेच्या जोरावर चांगली मजल मारली आहे.

त्याचबरोबरीने भारताविरुद्धचा सामना म्हटल्यावर मीडियाला आठवण होतेय ती आयपीएल दरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक दरम्यान झालेल्या संघर्षाची. हा काही क्रिकेटमधील संघर्ष नव्हता. नवीनचे चेंडू विरुद्ध विराटची फटके असा तो संघर्ष नव्हता. दोघांमध्ये उडाला मैदानावरील वागणुकीमुळे. त्यामुळे आज दोघंही आमने सामने येतील तेव्हा हा संघर्ष क्रिकेटशी संबंधितच असूदे असं सगळयांना वाटतंय.

(हेही वाचा-Koyna Dam Reservoir : कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकास करणार……! )

अफगाण कर्णधार या संघर्षावर काय म्हणाला? 

अफगाणिस्तान संघाच्या (India vs Afghanistan) पत्रकार परिषदे दरम्यान विराट – नवीन मधील संघर्षावर अफगाण कर्णधार हशमतुल्ला शाहिदीलाही मीडियाने घेरलं. त्या भांडणाचा परिणाम इतर अफगाण खेळाडूंवर झाला आहे का, असा प्रश्न विचारला असता हशमत्तुलाने शांतपणे यावर उत्तर दिलं.

‘भारत आमच्यासाठी दुसरं घर आहे. इथंच आम्ही सराव करतो. आणि आयर्लंड विरुद्ध घरचं मैदान म्हणूनही आम्ही भारतीय मैदानांचा वापर केला. इथल्या लोकांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आहे. आता राहिला प्रश्न नवीनचा. त्याचं विराट बरोबर झालेलं भांडण हा त्याच्या आक्रमक स्वभावाचा भाग होता. मैदानात दोन आक्रमक खेळाडूंमध्ये असे प्रसंग होतात. ते कुणाबरोबरही होऊ शकतं. असंच आम्ही त्याकडे बघतो,’

हशमतुल्लाने अफगाण खेळाडू सचिन आणि राहुल द्रविडला आदर्श मानतात असंही सांगितलं. आणि नंतर त्याने आपलं बोलणं क्रिकेटकडे वळवलं. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आता संघासमोरचं मोठं लक्ष्य विजय मिळवणं हेच असेल असं त्याचं म्हणणं होतं.

नवीन आणि विराट मैदानात एकमेकांशी कसे वागतात हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. पण, अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासात खरंच भारताने त्यांना खूप मदत केली आहे.

भारत अफगाण क्रिकेटपटूंसाठी दुसरं घर 

अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती चिघळल्यानंतर अफगाण संघ मागची काही वर्षं सातत्याने नॉयडा, लखनौ आणि डेहराडूनमध्ये वास्तव्याला होता. इथंच संघ सराव करत होता. आयर्लंड विरुद्‌धची संघाची आंतरराष्ट्रीय मालिकाही भारतातच पार पडली. संघाला यापूर्वी लालचंद रजपूत यांनी प्रशिक्षण दिलं आहे. तर आताही विश्वचषका दरम्यान अजय जाडेजा अफगाण संघाचा मेंटॉर म्हणून संघाबरोबर आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.