Jagannath Temple : ओरिसातील जगन्नाथ मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू होणार

जगन्नाथ मंदिर ट्रस्टचे प्रमुख रंजन कुमार यांनी माहिती दिली.

108
Jagannath Temple : ओरिसातील जगन्नाथ मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू होणार
Jagannath Temple : ओरिसातील जगन्नाथ मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू होणार

ओरिसातील जगन्नाथ मंदिर (Jagannath Temple) प्रशासनाने भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी १ जानेवारीपासून भाविक ड्रेस कोडसह मंदिरात प्रवेश करू शकतील. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी भाविकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मंदिरात छोटे कपडे, फाटलेली जीन्स, स्कर्ट, स्लीव्हलेससारख्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे, पण भाविकांनी मंदिरात कोणत्या प्रकारचे कपडे घालून यावे, याबाबत मंदिर प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. यावरही लवकरच निर्णय होईल, असे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Shahid Latif : पाकिस्तानमध्ये आणखी एका दहशतवाद्याची हत्या; पठाणकोट हल्ल्याशी जवळचा संबंध  )

जगन्नाथ मंदिर ट्रस्टचे प्रमुख रंजन कुमार यांनी सांगितले की, मंदिरात भाविक छोटे कपडे घालून येतात. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या कार्यकारिणीकडून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.