शिवसेना व धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी बुधवारी पुन्हा लांबणीवर पडली. यामुळे ठाकरे गटाचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे. सुप्रीम कोर्टातील या सुनावणीवरच शिवसेना ठाकरेंना परत मिळणार किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे. (MLA Disqualification)
सुप्रीम कोर्टाच्या निकालात राजकीय पक्षाचं महत्व अधोरेखित असताना आयोगाचा निकाल मात्र त्या तत्वांच्या विरोधात असल्याचा दावा ठाकरे गटाने केलाय. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. (MLA Disqualification)
(हेही वाचा – Ind vs Pak : भारता विरुद्धच्या सामन्यात काय असेल पाकिस्तानची रणनीती?)
सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. आज देखील या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयां विरोधात आज सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती. पण आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला प्रतीक्षा आणखी करावी लागणार आहे. (MLA Disqualification)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community