Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेमार्गावर 29 दिवसांचा मेगाब्लॉक घोषित; लोकलच्या 2,700 फेऱ्या रद्द होणार

खार ते गोरेगावदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम अत्यंत वेगाने सुरू करण्यात आले आहे

167
Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेमार्गावर 29 दिवसांचा मेगाब्लॉक घोषित; लोकलच्या 2,700 फेऱ्या रद्द होणार
Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेमार्गावर 29 दिवसांचा मेगाब्लॉक घोषित; लोकलच्या 2,700 फेऱ्या रद्द होणार

पश्चिम रेल्वेने खार ते गोरेगाव सहाव्या मार्गिकेसाठी (Western Railway Mega Block) २९ दिवसांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत हा मेगाब्लॉक (Megablock) असणार आहे. याकरिता तब्बल २७०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे वाहतुकीत कमीत कमी व्यत्यय यावा आणि प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी यासाठी ब्लॉक कामाचे काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले आहे.

याबाबत पश्चिम रेल्वने दिलेली माहिती अशी की, पश्चिम रेल्वेमार्गाच्या खार ते गोरेगावदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम अत्यंत वेगाने सुरू करण्यात आले आहे. ही मार्गिका ८.८ किलोमीटर लांबीची असून ७ ऑक्टोबरपासून या कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी २९ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीचे दहा ते बारा दिवस कोणतीही लोकल सेवा रद्द केली जाणार नाही, पण २० ऑक्टोबरपासून लोकलच्या २७०० फेऱ्या रद्द केल्या जातील. सुमारे ४०० सेवा अंशत: रद्द होतील. यामुळे लांब पल्ल्याच्या ६० गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरातील प्रवाशांना प्रवासाबाबत भविष्यात फायदा होईल, असेही पश्चिम रेल्वेने सांगितले आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification : ठाकरे गटाच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर )

अंधेरी प्लॅटफॉर्म क्रमांक ९ १९ आणि २० ऑक्टोबरपासून नॉन इंटरलॉकिंग काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कामाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ४ आणि ५ नोव्हेंबर २०२३ रोजी शनिवार सकाळी ९ ते रविवार ९ वाजेपर्यंत ट्रॅक काढण्यासाठी आणि जोडण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे 24 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.