इस्त्रायल आणि हमास (Israel-Palestine Conflict) युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. अजूनही ही युद्ध धुमश्चक्री सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला, लहान मुले तसेच वयोवृद्ध व्यक्तिंचा समावेश आहे. देशावर आलेले संकट परतवून लावण्यासाठी इस्त्रायल प्राणपणाने हमाससोबत लढत आहे, अशा युद्धजन्य परिस्थितीत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांच्या एका निर्णयामुळे त्यांच्यातील खऱ्या देशभक्ताचे दर्शन घडते. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरद्वारे शेअर केली आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी ट्विटरवर एक छायाचित्र शेअर केले आहे. त्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी आपल्या मुलाला हमास विरुद्धच्या युद्धात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्यावर पाठवत आहेत, असे दिसत आहे. त्यांचा मुलगा इस्त्रायली सैन्यात दाखल होण्यासाठी जात आहे. यावेळी पती-पत्नी दोघेही मुलाला हसून निरोप देत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्यातील विवेकी नेता आणि खऱ्या देशभक्ताचे दर्शन घडते.
🚨A Leader of conscience, A true Patriotism:
Benjamin Netanyahu sending his son on National Duty to Participate in the war against Hamas. Israeli Army.#HamasMassacre #PalestineUnderAttack #Israel #HamasTerrorism #Gaza #GazaUnderAttack #Gaza_under_attack #Hamas #Palestine pic.twitter.com/m8Otcddfiz— Israel & Palestine War (@IsraelHamasWarr) October 11, 2023
Join Our WhatsApp Community