Israel Palestine Conflict: हमासविरुद्ध इस्रायलकडून ‘त्या’ बॉम्बचा वापर ?काय आहे तीव्रता आणि परिणाम

लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या भागांमध्ये इस्रायलनं फॉस्फरस बॉम्ब टाकल्याचा आरोप पॅलेस्टाईननं केला आहे.

173
Israel Palestine Conflict: हमासविरुद्ध इस्रायलकडून 'त्या' बॉम्बचा वापर ?काय आहे तीव्रता आणि परिणाम
Israel Palestine Conflict: हमासविरुद्ध इस्रायलकडून 'त्या' बॉम्बचा वापर ?काय आहे तीव्रता आणि परिणाम

पॅलेस्टाईन आणि इस्रायल मध्ये युद्धाची महाभयंकर स्थिती पाहावयास मिळत आहे . मोठ्याप्रमाणावर रॉकेट्स डागण्यात आले आहे.गाझा पट्टीतून दहशदवादी संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ले केले.सध्या सुरु असलेल्या या हल्ल्यात हमासचे १५०० दहशदवादी मारले गेले आहे. तर या युद्धामध्ये इस्रायलनं फॉस्फरस बॉम्ब टाकल्याचा आरोप पॅलेस्टाईननं केला आहे.त्यामुळे इस्रायलची कृती युद्ध गुन्हेगारी असल्याचा पॅलेस्टाईनचा दावा आहे. (Israel Palestine Conflict)

लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या भागांमध्ये इस्रायलनं फॉस्फरस बॉम्ब टाकल्याचा आरोप पॅलेस्टाईननं केला आहे. व्हाईट फॉस्फरस बॉम्ब तयार करताना रबर आणि व्हाईट फॉस्फरसचा वापर करण्यात येतो. फॉस्फरस मेणासारखं रसायन असतं. तो दिसायला फिक्कट पिवळा किंवा रंगहीन असतो. सडलेल्या लसणासारखा वास त्यातून येतो. ऑक्सिजनच्या संपर्कात येताच तो पेट घेतो. ही आग पाण्यानं विझवता येत नाही. त्यामुळे फॉस्फरस धोकादायक मानला जातो.

(हेही वाचा : Dhananjay Munde : पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास शासन निर्णय निर्गमित)

काय आहे या बॉम्बची तीव्रता आणि त्याचे परिणाम
फॉस्फरस बॉम्ब पडल्यावर त्या भागातील ऑक्सिजन वेगानं संपू लागतो. त्यामुळे जी माणसं आगीत होरपळून मृत पडत नाहीत, त्यांचा श्वास कोंडून जीव जातो. पाणी टाकल्यानंतरही तो सहजासहजी विझत नाही. उलट धुराचे लोट तयार करत अधिक पसरतो. फॉस्फरस बॉम्ब १३०० डिग्री सेल्सिअसपर्यंत पेटू शकतो. त्यामुळे हाडंही वितळतात. या बॉम्बच्या संपर्कात आलेली व्यक्ती सुदैवानं वाचलीच, तरीही त्याला आयुष्यभर मरणयातना सहन कराव्या लागतात. त्याला सातत्यानं गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागतो. त्याचं आयुष्य कमी होतं. त्वचेवरील संसर्ग बऱ्याचदा रक्तापर्यंत पोहोचतो. त्यामुळे हृदय, यकृत, किडनीचं नुकसान होतं. यामुळे शरीरातील अनेक अवयव बंद पडण्याची शक्यता वाढते. (Israel Palestine Conflict)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.