अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि आझमतुल्लाह ओमारझाई यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना तगडे लक्ष्य उभे केले. ३ बाद ६३ अशी अफगाणिस्तानची अवस्था झाली होती. पण, शाहिदी व ओमारझाई यांच्या विक्रमी १२१ धावांच्या दणदणीत कामगिरी मुळे २७२ धावांचा डोंगर उभा राहिला आहे. (world cup 2023)
जसप्रीत बुमराहने ३९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले.अफगाणिस्तानचा पलटवार, मोडला १३ वर्षांपूर्वीचा विक्रम; अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ७व्या षटकात बुमराहने इब्राहिम झाद्रानला ( २२) बाद केले. १३व्या षटकात हार्दिक पांड्याने रहमनुल्लाह गुरबाजला ( २१) आणि पुढच्या षटकात शार्दूलने रहमत शाहला ( १६) माघारी पाठवले. ३ बाद ६३ अशा बिकट अवस्थेतून शाहिदी आणि ओमारझाई यांनी संघाला बाहेर काढले. दोघांनी विक्रमी १२१ धावांची भागीदारी केली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अफगाणिस्तानकडून दुसऱ्यांदाच शतकी भागीदारी झाली. हार्दिकने ही भागीदारी तोडताना ओमारझाईला ( ६२) बाद केले.
(हेही वाचा : Rafael Nadal Returns : राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार )
मोहम्मद नबी १९ धावांवर बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. कुलदीपने १० षटकांत ४० धावा देत १ विकेट घेतली. राशीद खानने ( १६) ट्वेंटी-२० क्रिकेटचा अनुभव अखेरच्या ५ षटकांत कामी आणला अन् संघाला ८ बाद २७२ धावांपर्यंत घेऊन गेला.
Join Our WhatsApp Community