स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या २४ विभागांमधून संकलित करण्यात आलेल्या पवित्र मातीची ‘अमृत कलश यात्रा’ बुधवारी ११ ऑक्टोबर २०२३ आयोजित करण्यात आली होती. मुंबई ९ ऑगस्ट ते २७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीदरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांच्या वतीने संबंधित भागातील नागरिकांकडून एकूण २४ अमृत कलशामध्ये माती गोळा करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते या सर्व कलशांमधील माती एकत्र करण्यात आली. (Maji Mati Maja Desh)
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आयोजित मुख्य सोहळ्यास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर तसेच राज्याचे रोजगार, कौशल्य विकास, नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक आमदार यामिनी जाधव, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. लेझीमच्या तालावर आकर्षक कवायत सादर करणारे विद्यार्थी, शिस्तबद्ध पथसंचलन करून लक्ष वेधून घेणारे स्काऊट गाईडचे विद्यार्थी, महानगरपालिका सुरक्षा दल आणि केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) चे जवान अन् फुलांनी सजवलेल्या वाहनातून अत्यंत देशभक्तीपर वातावरणात महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी महानगरपालिका मुख्यालय ते भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहादरम्यान ‘अमृत कलश यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. (Maji Mati Maja Desh)
(हेही वाचा – Rajasthan Assembly Election : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी मतदान)
या वेळी महानगरपालिका कर्मचारी कुणाल तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित नृत्य सादर केले. महानगरपालिकेतील अभियंता मिलिंद वाणी आणि त्यांच्या समूहाने वाद्यसंगीत आधारित देशभक्तीपर रचना सादर केल्या. तर, सीआयएसफच्या जवानांनी व महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यावर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यास महानगरपालिकेचे सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, सीआयएसएफचे जवान, शालेय विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Maji Mati Maja Desh)
स्वातंत्र्य सैनिक, वीर-वीरांगणांचा महानगरपालिकेच्या वतीने विशेष सन्मान
देशासाठी प्राणाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा महानगरपालिकेच्या वतीने या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये हुतात्मा बाबू गेनू यांचे नातू संजय सईद, भारतीय नौदलातील माजी सैनिक विश्वेश्वर सोनावणे, १९६२ सालचे भारत-चीन युद्ध, १९६५ सालचे भारत-पाक युद्ध आणि १९७१ सालचा बांगलादेश मुक्ती लढा, १९९९ च्या कारगील युद्धात सामिल झालेले माजी सैनिक एस. के. आहुजा, १९४२ च्या लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी दिवंगत भालचंद्र पाटील यांचे पुत्र सुभेदार दीपक पाटील, दिवंगत भालचंद्र पालेकर याचे पुत्र मंगेश पालेकर, स्वातंत्र्य सेनानी महादू बढे यांचे नातू नितीन बढे, शशीकला शहा यांचे जावई यांचा समावेश होता. या मान्यवरांना स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन या वेळी गौरविण्यात आले. (Maji Mati Maja Desh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community