Israel-Palestine Conflict : इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासच्या संस्थापकांपैकी एक ठार

दहशतवादी इस्लामी गट हमासचा संस्थापक गाझावरील इस्राइली हल्ल्यात मंगळवारी ठार झाल्याची नोंद झाली आहे.

134
Israel-Palestine Conflict : इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासच्या संस्थापकांपैकी एक ठार
Israel-Palestine Conflict : इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासच्या संस्थापकांपैकी एक ठार

इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine Conflict) यांच्यातील युद्धाचा पाचवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले केले जात आहेत. इस्रायल लष्कर हमासचं अस्तित्व मिटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांची हिटलिस्ट तयार करण्यात आली आहे. इस्राइल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये मोठे युद्ध सुरु आहे. हमासच्या दहशदवाद्यांनी इस्राइलवर शनिवारी दहशतवाद्यांनी इस्राइलवर अचानक हल्ला केला आहे. यामध्ये इस्राइल मधील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्राइलने देखील हमास दहशतवाद्यांना कडवे उत्तर दिले. दरम्यान नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार मोठी माहिती समोर आली आहे. इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासच्या संस्थापकांपैकी एक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. (Israel-Palestine Conflict)

दहशतवादी इस्लामी गट हमासचा संस्थापक गाझावरील इस्राइली हल्ल्यात मंगळवारी ठार झाल्याची नोंद झाली आहे. इस्राइलच्या कॅन पब्लिक ब्रॉडकास्टरने पॅलेस्टिनी अहवालाचा हवाला देत हे वृत्त दिले आहे. अब्दुल-फताह दुखान, ज्याला “अबू ओसामा” म्हणून ओळखले जाते. याचा मध्य गाझामधील नुसीरत शेजारच्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. यापूर्वी इस्त्राइलच्या गाढावरील ड्रोन हल्ल्यात हमासचे अर्थमंत्री आणि पॉलिटब्युरोच्या वरिष्ठ सदस्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला होता.

 (हेही वाचा : Maji Mati Maja Desh : मुंबईतील सर्व भागांमधील माती एकाच अमृत कलशात जमा)

इस्रायलकडून हमासच्या म्होरक्यांची हिटलिस्ट तयार
हमासकडून हवाई हल्ले सुरु असून इस्रायलमध्ये घुसूनही नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. तर इस्रायल लष्कराकडूनही गाझा पट्टीत जोरदार हल्ले केले जात आहेत. गाझामधून इस्रायलवर अनेक रॉकेट डागले जात आहेत, ज्यांचं प्रत्युत्तर करणं इस्रायलसाठी अवघड जाता दिसत आहे. यामुळे आता इस्रायल लष्कराने हमासच्या कमांडरांची हिटलिस्ट तयार करण्यात आली असून त्यांना कंठस्नान घालण्याची तयारी सुरु आहे. या ऑपरेशनसाठी इस्रायल लष्कर डेथ स्क्वॉड तयार करत आहे. इस्रायली डेथ स्क्वॉड हमासच्या म्होरक्यांचा खात्मा करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.