बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (११ ऑक्टोबर) संध्याकाळी एक भीषण अपघात (Bihar Train Accident) झाला. नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० प्रवासी जखमी झाले आहेत. तर या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिक माहितीनुसार, दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून येत असलेली नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस (Bihar Train Accident) आसामच्या गुवाहाटीतील कामाख्या जंक्शनकडे जात असताना ट्रेनचे तब्बल २१ डब्बे घसरले. हा अपघात रात्री ९:५३ वाजेच्या सुमारास घडला.
रेल्वे क्रमांक 12506 (आनंद विहार टर्मिनल ते कामाख्या) रघुनाथपूर स्थानकाच्या (Bihar Train Accident) मुख्य मार्गावरून जात होती. २१ डबे रुळावरून घसरले “, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले.
Train to ferry passengers for onward journey reached. Should start in a few minutes.
Now focusing on restoration.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) October 11, 2023
२३ डब्यांची ही ट्रेन (Bihar Train Accident) बुधवारी सकाळी ७:४० वाजता दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून सुमारे ३३ तासांच्या प्रवासासाठी कामाख्या येथे रवाना झाली होती.
(हेही वाचा – MLA Disqualification Case : नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच होणार सुनावणी)
या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती बक्सरचे पोलीस अधीक्षक यांनी दिली. रेल्वे पोलीस दलाच्या (Bihar Train Accident) अधिकाऱ्याने सांगितले की, किमान १०० प्रवासी जखमी झाले आहेत आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
गंभीर जखमी झालेल्यांना पाटणा येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून रुग्णवाहिका आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दोन गाड्या रद्द
दिल्ली ते दिब्रुगढ दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेससह (Bihar Train Accident) या मार्गावर धावणाऱ्या किमान २१ गाड्या वळवण्यात आल्या आहेत. पूर्व मध्य रेल्वे झोनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काशी पटना जन शताब्दी एक्सप्रेस (15125) आणि पटना काशी जन शताब्दी एक्सप्रेस (15126) या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community