Israel Palestine Conflict : ‘ऑपरेशन अजय’च्या माध्यमातून इस्रायलमधील भारतीयांची सुटका होणार

167
Israel Palestine Conflict : 'ऑपरेशन अजय'च्या माध्यमातून इस्रायलमधील भारतीयांची सुटका होणार

आज म्हणजेच गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी सलग सहाव्या दिवशी सुद्धा (Israel Palestine Conflict) इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील युद्ध सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत अनेक व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत. अशातच इस्त्रायलकडून गाझापट्टीत नागरी वस्त्या टार्गेट करण्यात आल्या. गाझापट्टीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला. या युद्धजन्य परिस्थितीत नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांने इस्रायलमध्ये असलेले भारतीय नागरीक अडकले आहेत. त्यांच्यासाठी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) सुरू केले आहे. स्वतः परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले एस जयशंकर

“इस्रायलमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात येत आहे. विशेष चार्टर विमाने (Operation Ajay) आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे. परदेशात राहणाऱ्या आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत,” असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

इस्रायलचे (Israel Palestine Conflict) महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांच्या दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये २० हजारांहून अधिक भारतीय आहेत. दूतावासाकडून गुरुवारच्या विशेष विमानासाठी नोंदणीकृत भारतीय नागरिकांच्या पहिल्या तुकडीला ई-मेल पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच्या विमानासाठी इतर नोंदणीकृत भारतीयांना ई-मेल आणि इतर माध्यमातून संदेश पाठवले जाणार असल्याचे इस्त्रायलमधील भारतीय दूतावासाने माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इस्राइलच्या हवाई हल्ल्यात हमासच्या संस्थापकांपैकी एक ठार)

ही तर फक्त सुरूवात

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Israel Palestine Conflict) सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे. नेतन्याहू यांनी ९ ऑक्टोबर सोमवार रोजी सांगितलं की, “हमासविरूद्ध बदला घेण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.” यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं की, हमासचे दहशतवादी जिथे लपले असतील त्या ठिकाणांना लक्ष्य केलं जाईल. इस्रायल आणि हमासकडून अद्यापही हल्ले सुरुच आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.