सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत रुग्णालयात दाखल

149

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना किंग्जवे हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करुन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भागवत यांना करोना झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे.

”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय डॉ. मोहनजी भागवत हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे.  लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो”.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.