Pullela Gopichand on Asian Games : ‘कधी कधी प्रशिक्षणाचा कंटाळा येतो,’ असं गोपीचंद का म्हणाले

भारताला ऑलिम्पिकमध्ये ३ पदकं, विश्वविजेतेपद स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी आणि जागतिक क्रमवारीत महिला, पुरुष तसंच दुहेरीत प्रथम क्रमांक या भारतीय बॅडमिंटनच्या प्रवासाचं श्रेय मुख्य प्रशिक्षक गोपीचंद यांना दिलं जातं.

144
Pullela Gopichand on Asian Games : ‘कधी कधी प्रशिक्षणाचा कंटाळा येतो,’ असं गोपीचंद का म्हणाले
Pullela Gopichand on Asian Games : ‘कधी कधी प्रशिक्षणाचा कंटाळा येतो,’ असं गोपीचंद का म्हणाले

ऋजुता लुकतुके

पुलेला गोपीचंद (Pullela Gopichand on Asian Games) यांनी २००६ मध्ये भारतीय बॅडमिंटनचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सूत्र हाती घेतली. देशातच होणाऱ्या २०१० च्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण विजेती कामगिरी करावी असं उद्दिष्टं तेव्हा त्यांच्यासमोर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर राष्ट्रकूल स्पर्धेत भारताने महिलांच्या दुहेरीतही दुर्मिळ पदक मिळवलं.

आणि पुढे जाऊन पुढच्या १७ वर्षांत भारतीय बॅडमिंटनने ऑलिम्पिक, ऑल इंग्लंड. थॉमस चषक, विश्वविजेतेपद अशी अनेक पदकं पाहिली. पुरुष, महिला तसंच पुरुषांच्या दुहेरीत भारतीय खेळाडू जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरही पोहोचले. सध्या बॅडमिंटनपटूंसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील यश ताजं आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत भारताने बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकलं. तर एकूण ३ पदकं मिळवली.

या यशानंतर पुलेला गोपीचंद खुश तर आहेतच. संघाला त्यांनी ऑलिम्पिकची तयारी करण्याचे निर्देशही दिले आहेत. पण, त्याचवेळी हैद्राबादमधल्या सत्कार समारंभात त्यांनी मनातील एक गोष्ट बोलून दाखवली. ‘मलाही कधी कधी प्रशिक्षण करण्याचा कंटाळा येतो. पण, खेळाडूंची अशी कामगिरी मग अशावेळी मला पुढे वाटचाल करण्यासाठी बळ देते,’ असं गोपीचंद म्हणाले.

(हेही वाचा-India China Relations : भारत-चीनमधील तणाव निवळणार कि नाही ?; चर्चेची २० वी फेरी काय सांगते

‘प्रणॉय असेल किंवा सात्त्विक, चिराग आणि श्रींकात..यांच्या खेरिज इतर कुणीही घेतलेल्या मेहनतीचं चीज केलं. आणि त्यासाठी पदकही मिळवलं की, मला त्यातून प्रेरणा मिळते. खेळाडूंच्या यशामुळे मी काम करतच राहतो,’ असं पुढे गोपीचंद म्हणाले.

म्हणजेच गोपीचंद इतक्याच मुख्य प्रशिक्षकाची भूमिका सोडणार नाहीत, हे ही त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर खेळाडूंसाठी पुढचं उद्दिष्टंही त्यांनी निर्धारित केलं आहे. कारण, पॅरिस ऑलिम्पिकसाठी आता १ वर्षांहून कमी काळ उरला आहे.

‘ऑलिम्पिकची तयारी आता सुरू व्हायला हवी. हे पात्रता वर्षं आहे. अशावेळी जितके खेळाडू क्रमवारीच्या माध्यमातून पात्र ठरतील तेवढं आपल्याला हवं आहे. त्यामुळे पुढचं उद्दिष्टं हे क्रमवारी उंचावण्याचं आहे. मी संघाबरोबर स्पर्धेच्या ठिकाणी प्रवास करणार आहे. त्यानंतर ऑलिम्पिकची खास तयारी सुरू करण्यात येईल,’

गोपीचंद हे खेळाडूंवर बॅडमिंटन कोर्टवर स्वत: उतरुन मेहनत घेणारे प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. कोर्ट बरोबरच कोर्टबाहेरही ते खेळाडूंमध्ये गुंतवणूक करतात.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.