Navratri 2023 : नवरात्र आयोजकांनी मंडपात रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

131
Navratri 2023 : नवरात्र आयोजकांनी मंडपात रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Navratri 2023 : नवरात्र आयोजकांनी मंडपात रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अनेक मिरवणुकांमध्ये किंवा सण समारंभांमध्ये लोक नाचत असताना हृद्यविकाराचा झटका येऊन अनेक जणांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याप्रमाणे मागील वर्षीही गरबा दांडिया खेळत असतानाच अनेक तरुणांच्या चांगलेच जीवावर बेतले होते. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (१२ ऑक्टोबर) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व दांडिया आयोजकांना आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक असणार असल्याचे निर्देश दिले आहेत.( Navratri 2023)
मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहेत.

अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दांडीयाचे आयोजन करण्यात येते. त्यात आयोजकांच्यावतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक आहे.

हेही वाचा : Sharad Pawar :सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले होते)

बदललेल्या जीवनशैलीमुळे आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मु्ंबईसह राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांसह व्यावसायिकपणे रास दांडियाचे आयोजन केले जाते. हे आयोजन मोठ्या मैदानात करण्यात येते. त्यामुळे आरोग्यविषयक आणीबाणी उद्भवल्यास दांडिया खेळणाऱ्यावर योग्य आणि तातडीने प्राथमिक उपचार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आता दांडिया आयोजकांना प्राथमिक उपचार सज्ज ठेवण्यासह रुग्णवाहिकादेखील तैनात करावी लागणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.