-
ऋजुता लुकतुके
ॲपल कंपनीचा नवीन आयफोन १५ लाँच होऊन एक महिनाही नाही झाला आणि ग्राहकांनी फोन लवकर तापत असल्याच्या तसंच स्क्रीन बर्नच्या तक्रारी केल्या आहेत. ॲपल कंपनीने यावर्षी आपली नवीन आयफोन १५ सीरिज लाँच केली तेव्हा या फोनविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. पहिल्याच दिवशी फोनचं बुकिंग करताना ग्राहकांमध्ये भांडणंही झाली, इतकी झुंबड या फोनसाठी उडाली होती. अशा या आयफोन १५ सीरिजविषयी आता काही ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. (iPhone 15 Pro)
आयफोन १५ सीरिजमध्ये आयओएस १७ हा प्रोग्रामिंग अपडेट करताना लोकांना काही अडचणी येत आहेत. अपडेट नंतर फोन अचानक बंद होत असल्याची तक्रार लोकांनी केली आहे. बग स्टेमिंगमुळे ही समस्या उद्भवत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. बग म्हणजे एखादा प्रोग्राम रन करताना त्रास देणारे तांत्रक घटक. फोन अचानक बंद होण्याबरोबरच थोड्याशा वापरानंतर फोन गरम होत असल्याची तक्रारही काहींनी केली आहे. बोलता बोलता फोन गरम होतो असं काहींचं म्हणणं आहे. (iPhone 15 Pro)
अशा तक्रारी येतच असताना आता नवीन एक तक्रार ऐकू येत आहे ती स्क्रीन बर्नची. यात स्क्रीनचं तापमान वाढल्यामुळे ती ब्लर होते. आणि तिची स्पष्टता कमी होते. स्क्रीनवरील अक्षरं किंवा चित्र वाचणं अवघड होतं. हा सुद्धा एक प्रकारे फोन गरम होण्याचाच प्रकार आहे. तरुण वत्स या भारतातील एका टेकगुरूने आपल्या ट्विटर हँडलवर याविषयीची माहिती दिली आहे. तरुण हा नवनवीन तंत्रजान वापरणारा आणि ते शिकून घेणारा एक तरुण आहे. तो आपल्या शोमध्ये लोकांना त्याविषयीची माहितीही देतो. त्याचे मोबाईल तंत्रज्ञानावरील व्हीडिओ प्रसिद्ध आहेत. (iPhone 15 Pro)
अलीकडे एका व्हीडिओत तरुणने आयफोनच्या स्क्रीन बर्नविषयी लिहिलं आहे.
Apple’s iPhone 15 Pro Max is reportedly experiencing screen burn-in issues, adding to a growing list of problems for the company this year.#iPhone15Series #iphone15pro #Apple pic.twitter.com/HDsQ0iccHw
— Tarun Vats (@tarunvats33) October 11, 2023
(हेही वाचा – Pakistan-occupied Kashmir : अमेरिकी राजदूताच्या पाकव्याप्त काश्मीर भेटीविषयी भारताने घेतला आक्षेप)
आयफोन सीरिज १५ मधील प्रो आणि प्रो मॅक्स या दोन मॉडेलमध्ये ही समस्या येत असल्याचं तरुणने नमूद केलंय. इतरही काही तंत्रज्ञानविषयक वेबसाईटनी हा मुद्दा उचलला आहे. तर काहींनी त्यावर उपाय शोधण्याचाही प्रयत्न केलाय. स्क्रीनचं आयुष्य वाढवण्यासाठी स्क्रीनसेव्हर ठेवावा. म्हणजे तुम्ही मोबाईलचा वापर करत नसताना स्क्रीनवरील शेवटची फ्रेम बदलून ती स्क्रीनसेव्हरची येते. त्यामुळे स्क्रीनमध्ये बदल होतो आणि एकच एक मजकूर दाखवण्यासाठी खर्च होणारी जास्तीची ऊर्जा वाचते. (iPhone 15 Pro)
स्क्रीनसेव्हर ठेवण्यासाठी ॲपल मेन्यूतून तुम्हाला सिस्टिम प्रेफरन्समध्ये जायचं आहे. आणि तिथं स्क्रीनसेव्हरचा पर्याय निवडून आवडेल तो स्क्रीनसेव्हर तुम्हाला सेट करायचा आहे. किती कालावधीनंतर स्क्रीनवरील मजकूर बदलून स्क्रीनसेव्हर लागेल हा कालावधीही तुम्ही इथं बदलू शकता. सिस्टिममध्ये असलेला हा कालावधी तुम्ही कमी केलात तर त्यामुळे फोनच्या स्क्रीनचं आयुष्य आणखी वाढणा आहे. हे उपाय लोकांनी आणि तज्ञांनी सुचवलेले आहेत. पण, स्वत: ॲपल कंपनीने येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (iPhone 15 Pro)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community