भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (१४ ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं ४१ वे अधिवेशन मुंबई येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.भारतात तब्बल ४० वर्षांनंतर ऑलिम्पिक अधिवेशन पुन्हा भारतात होत आहे.
ऑलिम्पिक समितीच हे अधिवेशन मुंबईतील जिओओल्ड सेंटरमध्ये १४ ते १७ ऑक्टोबर या दरम्यान पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ४१ व्या अधिवेशनात स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित राहणार आहे.याआधी १९८३ मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी अधिवेशन पार पडलं होतं.
(हेही वाचा : Raj Thackeray : जनता रोड टॅक्स देते मग टोलचा भार कशाला, राज ठाकरे यांचा सीएम शिंदेंना सवाल)
ऑलिम्पिकचं ४१ वे अधिवेशन भारतात होत आहे ही भारतीय क्रीडा विश्वासाठी महत्वाची गोष्ट आहे. यामुळे भारताला आगामी काळात अनेक स्पर्धांचं यजमानपद भुषवण्यासाठी संधी मिळू शकते. याबाबत केंद्रीय अनुराग ठाकुर यांनी देखील माहिती दिली आहे. २०३६ची ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हावी यासाठी भारत दावा करु शकतो. तर नवी मुंबई मेट्रो चे लोकार्पण होणार का अशी चर्चा रंगली आहे. यासंदर्भात अधिकृतरीत्या घोषणा कुठेही करण्यात आलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community