सी. डी. बर्फीवाला रोड ते जुहू-वर्सोवा रोड पर्यंत रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि यावर मात करून विना अडथळा पश्चिम द्रुतगती महामार्ग वाहतूक व्हावी याकरता या मार्गावर आता मेट्रो २ प्रकल्प कामामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावर आता मेट्रो लाईंनच्या खालील बाजूने नवीन उड्डाणपुल बांधण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर मेट्रो लाईनच्या खालील बाजूने पूल बांधण्याची चाचपणी सुरू असून यासाठी आयआयटी या संस्थेची नेमणूक महापालिका प्रशासनाने केली आहे. (C. D. Barfiwala Road, Juhu-Versova Road)
महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हीपीडी जंक्शनवरील वाहतूक टाळण्यासाठी व पश्चिम द्रुतगती महामार्गापासून वर्सोवा मार्गापर्यंत विनासिग्नल प्रवासाच्या हेतूने सी. डी. बर्फीवला रोड ते जुहू-वर्सोवा रोड पर्यंत असलेल्या रस्त्यालगल उड्डाणपुल बांधण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. परंतु मेट्रो लाईन “२-बी”चे काम हे गुलमोहर रस्त्यापर्यंत त्याच मार्गावरुन चालू असल्याने व जेव्हीपीडी जंक्शनवर मेट्रो स्थानक होणार असल्यामुळे त्या मार्गावर उड्डाणपूल बांधणे कठीण होते. त्यामुळे, या उड्डाणपूल जवळच उपलब्ध असलेल्या भारतीय विमान पत्तन प्राधिकरण यांच्या अखत्यारितील जागेतून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला भारतीय विमान पत्तन प्राधिकरण यांनी ०९ एप्रिल २०१९ रोजी तयारी दर्शवली होती. (C. D. Barfiwala Road, Juhu-Versova Road)
(हेही वाचा – Mumbai Municipal Schools : महानगरपालिका शाळांमधील मध्यान्ह भोजन : सहआयुक्तांनी घेतली संस्था चालकांची शाळा)
परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीय विमान पत्तन प्राधिकरण यांनी आपल्या अखत्यारितील येणाऱ्या जागेमध्ये उंचीला मर्यादा असून या ठिकाणची उंची मर्यादा ० (शुन्य) मी. इतकी आहे, असे १६ मे २०२३ रोजी अभिप्राय दिले. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ०७ जून २०२३ रोजी बैठक झाली. त्यात हे उड्डाणपूल भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाच्या यांच्या अखत्यारितील जागे ऐवजी मेट्रो लाईनक्याच्या खालून बांधण्यासाठी शक्यतेची पडताळणी करण्याचे सांगितले. त्या अनुषंगाने आय. आय. टी मुंबई यांचे तज्ञ प्रा. आर. एस. जार्गीड यांना याकामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मेट्रो लाईन २ बीच्या खालून पूल बांधण्याचा अभ्यास सुरू आहे. या कामासाठी १५ लाख रुपये सल्लागार सेवेसाठी खर्च केले जाणार आहेत. (C. D. Barfiwala Road, Juhu-Versova Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community