Haji Ali Dargah Bridge : हाजी अली दर्गा सेतूची उंची वाढवणार, शेडही उभारणार

हाजीअली दर्गाच्या ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ४०० मीटर लांबीचा सेतू पार करत जावे लागते.

387
Haji Ali Dargah Bridge : हाजी अली दर्गा सेतूची उंची वाढवणार, शेडही उभारणार
Haji Ali Dargah Bridge : हाजी अली दर्गा सेतूची उंची वाढवणार, शेडही उभारणार

वरळीतील हाजी अली दर्गामध्ये जाण्यासाठी भाविकांना समुद्राच्या भरतीच्या वेळी तसेच उन्हाळ्यासह पावसाळ्यात होणारा त्रास लक्षात घेता या दर्गाकडे जाणाऱ्या सागरी सेतूची उंची वाढवण्याचा विचार सरकारच्यावतीने सुरु आहे. एवढेच नाही भाविकांना दर्गामध्ये जाताना ऊन आणि पावसापासून बचाव व्हावा यासाठी तंबू स्वरुपात शेड उभारण्यात येणार असल्याची माहिती शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी मुंबई महापालिका मुख्यालयातील पत्रकारांशी संवाद साधताना दिली. (Haji Ali Dargah Bridge)

शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी शहरातील प्रार्थनास्थळांच्या नुतनीकरणासह भाविकांना त्याठिकाणी दर्शन घेताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार प्रयत्नशीर असल्याचे सांगितले. ते म्हणाले, हाजीअली दर्गाच्या ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ४०० मीटर लांबीचा सेतू पार करत जावे लागते. बऱ्याच वेळेला समुद्राला भरती आल्यास सेतूवर लाटांचे पाणी येते. त्यामुळे या सेतूची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी जिल्हा नियोजन समिती च्यामाध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आहे. तसेच याठिकाणी शौचालयांची सुविधा तसेच या रस्त्याला जोडणाऱ्या भुमिगत मार्गाचे सुशोभीकरण केले जाईल. (Haji Ali Dargah Bridge)

(हेही वाचा – iPhone 15 Pro : ॲपलचा नवीन फोन कधी अचानक बंद होतो तर कधी स्क्रिनच बर्न होते, तुम्हालाही असा अनुभव आला आहे का?)

बाणगंगा आणि वाळकेश्वर मंदिराचा विकास आराखडा

बाणगंगाचा परिसर हा पुरातन असून याठिकाणी असलेल्या अतिक्रमणांमधील पात्र लोकांचे पुनर्वसन केले जावे अशाप्रकारच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबादेवी मंदिराचाही विकास आराखडा तयार तयार असून यासाठी सुमारे २२० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. उज्जेन आणि काशी विश्वेश्वर मंदिरांमध्ये ज्या घटना घडल्या आहेत, त्याची पुनर्रावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलत मुंबादेवी मंदिराच्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. (Haji Ali Dargah Bridge)

महालक्ष्मी मंदिरासाठी आकृतीचे वाहनतळ होणार खुले

महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांना वाहने उभी करण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेला आकृती बिल्डरकडून प्राप्त झालेल्या वाहनतळाचा वापर या भाविकांना वाहने उभी करण्यासाठी केला जाणार आहे. यासाठी आकृती वाहनतळ ते महालक्ष्मी मंदिर असा स्वतंत्र रस्ता भाविकांसाठी तयार केला जाणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून ही सुविधा खुली केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Haji Ali Dargah Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.