ED Seized MLA Property : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटींची संपत्ती जप्त

ईडीने जप्तीची कारवाई दुसऱ्यादा केली असून यापूर्वी २०२१ मध्ये २३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

190
ED Seized MLA Property : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटींची संपत्ती जप्त
ED Seized MLA Property : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटींची संपत्ती जप्त

कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेकानंद पाटील यांची दीडशे कोटी रुपयांची संपत्ती गुरुवारी ईडीने जप्त केली आहे. ईडीने जप्तीची कारवाई दुसऱ्यांदा केली असून यापूर्वी २०२१ मध्ये २३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. माजी आमदार विवेक पाटील यांची आता पर्यंत जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा आकडा ३८६ कोटींवर गेला आहे. जप्त करण्यात आलेल्या या संपत्तीत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि इतर जमिनीचा समावेश आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये पाटील यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली असून पाटील हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. (ED Seized MLA Property)

कर्नाळा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदार अशा एकूण ७६ जणांवर ठेवीदार-खातेदारांची फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्ह्या नोंदवण्यात आला होता. मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्याबाबत सक्तवसुली संचनालयाने (ED) ने गुन्हा दाखल करून तपास सुरु करून १५ जून रोजी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली होती. (ED Seized MLA Property)

(हेही वाचा – Operation Ajay : इस्रायलहून 230 भारतियांसह पहिले विमान रवाना होणार; काय म्हणाले परराष्ट्रमंत्री…)

ईडीच्या तपासात ६७ बोगस बँक खाते उघडून सुमारे ५६० कोटी रुपायांचे कर्ज बँकेतून घेण्यात आले होते, कर्जाची रक्कम बोगस खात्यातून निधीच्या माध्यमातून पाटील यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्था, बँक खात्यात वळवण्यात आली होती. या निधीचा वापर कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा क्रीडा अकादमी या संस्थेकडे वळवण्यात आलेला या निधीचा उपयोग क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यासारख्या संपत्तीच्या बांधकामासाठी आणि इतर वैयक्तिक फायद्यांसाठी केला असल्याचे ईडीने म्हटले आहे. बँक घोटाळ्यातील पैशांचा वापर करण्यात आलेल्या कर्नाळा क्रीडा संकुल आणि इतर जमिनी असा मागील दोन वर्षात एकूण ३८६ कोटीची संपत्ती ईडीने ताब्यात घेतली आहे. (ED Seized MLA Property)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.