Forbes List of Billionaires : देशात मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत, तर अव्वल १०० श्रीमंतांमध्ये ३ नवीन नावं

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष व कार्यकारी प्रमुख मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान राखला आहे.

115
Forbes List of Billionaires : देशात मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत, तर अव्वल १०० श्रीमंतांमध्ये ३ नवीन नावं
Forbes List of Billionaires : देशात मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत, तर अव्वल १०० श्रीमंतांमध्ये ३ नवीन नावं
  • ऋजुता लुकतुके

फोर्ब्स मासिकाच्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत ९२ अब्ज अमेरिकन डॉलरच्या संपत्तीसह मुकेश अंबानी अव्वल आहेत.  रिलायन्स समुहाचे अध्यक्ष व कार्यकारी प्रमुख मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान राखला आहे. त्यांची एकूण संपत्ती ९२ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. याशिवाय फोर्ब्सच्या १२ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या यादीत काहींनी पहिल्या शंभरातील आपलं स्थान गमावलंय. तर ३ कुटुंबांनी पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळवलंय. नव्याने या यादीत आलेल्या तिघांची ओळख करून घेऊया. (Forbes List of Billionaires)

एशियन पेन्ट्सचं दाणी कुटुंब

दाणी कुटुंबीय या यादीत सध्या २२ व्या क्रमांकावर आहे. मार्च २०२३ ला संपलेल्या आर्थिक वर्षात एशियन पेंट्सचे अकार्यकारी प्रमुख अश्विन दाणी यांची मालमत्ता ८ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. मागच्याच महिन्यात २८ सप्टेंबरला अश्विन यांचं वृद्‌धापकाळाने निधन झालं आहे.

त्यांनी वाढवलेली एशियन पेंट्स ही रंग निर्मिती करणारी कंपनी देशातला सर्वोत्तम ब्रँड समजला जातो. तसंच कंपनीचा जवळ जवळ ९८ टक्के महसूल हा देशांतर्गत बाजारपेठेतूनच येतो. मार्च २०२३ च्या तिमाहीत कंपनीने १९ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. आणि कंपनीचा महसूल ४.१ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. त्यामुळेच दाणी कुटुंबीयांच्या मालमत्तेही वाढ झाली आहे. (Forbes List of Billionaires)

लँडमार्क ग्रुपच्या रेणुका जगतियानी

दुबई स्थित लँडमार्क ग्रुपच्या रेणुका जगतियानी या यादीत ४४ व्या क्रमांकावर आहेत. आणि त्यांची एकूण मालमत्ता आहे ४.८ अब्ज अमेरिकन डॉलर. यावर्षी रेणुका यांचे पती मुकेश उर्फ मिकी जगतियानी यांचं मे महिन्यात निधन झालं. त्यानंतर रेणूकाच कंपनीचा पदभार सांभाळत आहेत. त्यांचे पती मुकेश हे गेल्यावर्षी फोर्ब्सच्या यादीत तब्बल ३११ व्या स्थानावर होते. पण, यावर्षी समुहाने मोठी प्रगती केली आहे.

रेणुका जगतियानी यांना पतीकडून वारसा हक्काने ४.८ अब्ज अमेरिकन डॉलर मिळाले आणि त्यामुळे त्यांचा यादीत समावेश झाला आहे. अर्थात, स्वत: रेणूका या १९९३ पासून कंपनीशी निगडित आहेत आणि विविध पदांवर कार्यरत आहेत. मॅक्स आणि होमसेंटर हे कंपनीचे प्रसिद्ध ब्रँड आहेत. (Forbes List of Billionaires)

(हेही वाचा – Ashish Shelar : ‘उबाठा’ सेनेवाले नुसते शंकाखोर नव्हे, तर शंखासूर; आशिष शेलार यांचा टोला)

केपीआर मिलचे के पी रामस्वामी

केपीआर मिलचे संस्थापक के पी रामस्वामी हे २.८ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मालमत्तेसह या यादीत शंभराव्या स्थानावर आहेत. त्यांच्या टेक्टाईल तसंच साखरेच्या मिल आहेत. आणि रामस्वामींचे दोन भाऊ याच उद्योगात भागिदारीत त्यांच्याबरोबर आहेत.

१९८४ मध्ये त्यांनी ही मिल स्थापन केली आणि त्यानंतर वर्षभरात टेक्सटाईल मिलमधून १२८ दशलक्ष कपडे तयार होतात. हे कपडे मग एच अँड एम, वॉलमार्ट असा जागतिक ब्रँडनाही पाठवले जातात. केपीआर मिलमध्ये काम करणाऱ्या ३०,००० कर्मचाऱ्यांमध्ये ९० टक्के महिला आहेत.

दरम्यान, भारतीय अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी यांनी आपला प्रथम क्रमांक कायम राखलाय. तर झिरोदाने नितीन कामत ५.५ अब्ज अमेरिकन डॉलर सह यादीत ४० व्या स्थानावर आहेत. पण, या यादीतील ते सगळ्यात तरुण अब्जाधीश आहेत. तर देशातील पहिल्या १०० अब्जाधीशांची मिळून एकूण मालमत्ता ७२९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. (Forbes List of Billionaires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.